gangapur police charged two constables in bribe case  Saam Digital
क्राईम

Sambhajinagar Crime: लाचेच्या रक्कमेसह पाेलिसांनी ठाेकली धूम, गंगापूर ठाण्यात गु्न्हा दाखल

sambhajinagar anti corruption bureau traps two constables in bribe case : या प्रकरणामुळे पाेलिस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास गंगापूर पोलिस करीत आहेत.

डॉ. माधव सावरगावे

छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळू वाहतूकदारांकडून 15 हजाराची लाच प्रकरणी दोन पोलिसांवर एसीबीने कारवाई केली आहे. दरम्यान तक्रारदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने रचलेल्या सापळ्याची पाेलिसांना कुणकुण लागताच दाेघांनी स्वीकारलेली लाचेची रक्कम घेऊन पोबारा केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गंगापूर पोलिस उपविभागीय कार्यालयात दोघेही पोलिस हवालदार म्हणून कार्यरत हाेते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

एसीबी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनूसार सुनील रठोड व लक्ष्मीकांत सपकाळ अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. या दोन पोलिस कर्मचारी आणि एका व्यक्तीसह तिघांवर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

जालन्यात वाळू चाेरांना 2 कोटी 25 लाखांचा दंड

जालन्यात अवैध वाळू माफियांविरोधात महसूल प्रशासन ॲक्शनमोडवर आले आहे. गेल्या 54 दिवसांत तब्बल 68 कारवाया करत 2 कोटी 25 लाखांचा दंड महसूल खात्याने वाळूमाफियांना ठोठविला आहे.

मागील दोन महिन्यांत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 40 वाहनांवर महसूलच्या पथकाने कारवाई केली आहे. दरम्यान जालन्यात प्रशासनाकडून 23 वाळू घाटांसाठी 8 वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत. परंतु एकीकडे वाळू डेपो सुरू असतानाच दुसरीकडे मात्र अवैध वाळू उत्खनन आणि विक्री जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

का रे दुरावा! फडणवीस-शिंदेंनी एकमेकांशी बोलणं टाळलं, राजकीय वर्तुळात चर्चांना जोर, पाहा व्हिडिओ

Samruddhi Kelkar: डोळ्याला गॉगल लावलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं का?

Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा लग्न सोहळा धुमधडाक्यात, नवरदेव पलाश मुच्छल सांगलीत दाखल

अमराठी महापौर दिलात तर रस्त्यावर उतरु! सर्व पक्षांना कोणी दिला इशारा? VIDEO

Maharashtra Live News Update : मालेगावात घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगरमधील पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT