CCTV footage captures Gala Ghotu Gang member strangling a woman and snatching jewelry in Delhi saam tv
क्राईम

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Gala Ghotu Gang Video: ही घटना दिल्लीतील शकरपूर येथील आहे. एका महिलेच्या मागून एक तरुण मागून येतो आणि एका महिलेचा गळा दाबून तिला बेशुद्ध करतो. यानंतर, तो तिचे कानातले आणि गळ्यातील साखळी हिसकावून घेतो.

Bharat Jadhav

  • शकरपूर भागात एका महिलेवर 'गलाघोंटू गँग' कडून हल्ला झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

  • आरोपी महिलेच्या पाठीमागून येऊन गळा दाबतो आणि तिच्या दागिन्यांची चोरी करतो.

  • ही टोळी पुरुषांवरही हल्ले करून चोरी करत असल्याचं समोर आलंय.

  • दिल्लीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सध्या दिल्लीत एका नवीन टोळीची दहशत वाढलीय. या टोळीचे नाव गलाघोंटू गँग. या टोळीच्या दहशतीमुळे दिल्लीतील महिला एकट्या दुकट्या घराबाहेर जाण्यापासून घाबरत आहेत. फक्त महिलांनाच नाहीतर पुरुषांवर ही टोळी हल्ला करत, त्याची लूटमार करते. या टोळीतील गुंड व्यक्तीच्या पाठीमागून हल्ला करतात. त्यांचा गळा दाबतात, व्यक्ती बेशुद्ध झाला का त्याच्याकडील पैसे आणि मोबाईल चोरून पळून जातात.

आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा शकरपूर येथील आहे. येथे या टोळीनं एका महिलेला आपला शिकार बनवलंय. यामध्ये एका महिलेला एकजण मागून मानेने धरतो. आणि खाली पाडतो. ती महिला बेशुद्ध होते, त्यानंतर तो पुरूष तिचे दागिने हिसकावून तेथून पळून जातो. ही घटना दिल्लीतील शकूरपूर येथे घडलीय.

एक तरुण एका महिलेच्या पाठीमागून येतो आणि त्या महिलेचा गळा पाठीमागून दाबतो. ज्यामुळे ती बेशुद्ध पडते. यानंतर तो गुंड त्या महिलेच्या कानातले आणि गळ्यातील साखळी हिसकावून घेतो. त्यानंतर त्याच्या साथीदारांसह स्कूटीवरून पळून जातो.

पूर्व दिल्लीतील शकरपूरचा हा व्हिडिओ ७ ऑगस्ट रोजी रात्री १०:४० वाजण्याचा सुमारास रेकॉर्ड झालाय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला रस्त्यावरून चालत असल्याचे दिसून येते. तर एक मुलगा मागून धावत येतो आणि दोन्ही हातांनी महिलेचा गळा दाबतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

Gadchiroli : थरारक! इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली; दुर्घटनेमध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT