four held for theft from closed textile unit in palghar saam tv
क्राईम

पालघर : एक कोटी 76 लाख रुपयांच्या मशिनरी चाेरी प्रकरणी चाैघांना अटक, 'बॉम्बे रेऑन'च्या वाॅचमनचा टाेळीत सहभाग

Palghar Latest Marathi News : विशेष म्हणजे ही चोरी करताना बंद कारखान्यात असलेल्या वॉचमनचा चोरटे आधार घेत असतं अशी माहिती पालघर पोलिसांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

रुपेश पाटील

Palghar :

बोईसर तारापूर एमआयडीसीतील बंद कंपन्यांमधून कोट्यावधी रुपयांची मशनरी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. पाेलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी विविध गुन्ह्यातील उकल केल्याची माहिती माध्यमांना दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बोईसर तारापूर एमआयडीसीतील बॉम्बे रेऑन या कारखान्यात तब्बल एक कोटी 76 लाख रुपयांची इलेक्ट्रिक मशिनरीची चोरी झाली हाेती. या प्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात मागील काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Maharashtra News)

या तपासात सापळा रचून पालघर पोलिसांनी चार जणांना अटक केली. पाेलिस आणखी काही संशयित आरोपींचा शोध घेताहेत. विशेष म्हणजे ही चोरी करताना बंद कारखान्यात असलेल्या वॉचमनचा चोरटे आधार घेत असतं. वॉचमनने माहिती दिल्यानंतरच रात्रीच्या सुमारास हे चाेरटे कोट्यावधी रुपयांची मशिनरी लंपास करत अशी माहिती पालघर पोलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : सणांच्या घाईत त्वचेसोबत 'ही' चूक होत नाही ना? नॅचरल ग्लो हवा असेल, तर आजपासूनच करा हे ५ बदल

Private Part Hygiene Tips: प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका! ‘या’ ५ गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या

Maharashtra News Live Update: ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात विशेष दर्शन पाससाठी डिजिटल पेमेंट सुरू करण्याची मागणी

Aadhaar Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! मोबाईल नंबर बदलण्यासाठी ही प्रोसेस करा फॉलो

Auto Drivers Strike : मुंबईत परप्रांतिय चालकांचा संप, ३ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद; कारण ऐकून तुम्हालाही राग येईल

SCROLL FOR NEXT