four arrested along with whale fish vomit in ratnagiri saam tv
क्राईम

Konkan News : थरारक पाठलागानंतर व्हेल माशाच्या उलटीसह चाैघांना अटक, वनविभागाची राजापूरात कारवाई

ही कारवाई विभागीय वनअधिकारी दीपक खाडे व सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आली आहे.

अमोल कलये

Ratnagiri News :

राजापूरात वनविभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करत व्हेल माशाची उलटी (whale fish vomit) प्रकरणी तसेच तस्करी करणा-या तिघांना पकडले. या तिघांवर राजापूर पाेलिस ठाण्यात (rajapur police station) गुन्हा नाेंदविण्यात आला. न्यायालयाने तिन्ही संशयितांना 16 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावल्याची माहिती वन विभागातील अधिकारी यांनी साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)

वनविभागास काही जण व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानंतर वनविभागाने राजापूर तालुक्यातील ताम्हाणे-पाचल रस्त्यावर सापळा रचला. या सापळ्यात संशयित अलगद सापडले.

वन विभाग आणि पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार राजकुमार सुरेश शेलार (नांदीवली, कल्याण पूर्व), आकाश राजेद्र घाडगे (सानपाडा), रुपेश गणपत (आवरे, रायगड) आणि जगदीश पाेतदार (पाचल, राजापूर, रत्नागिरी) यांना व्हेल माशाच्या उलटी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने चाैघांना १६ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : वयाच्या 30-40 मध्येच वाढतोय BP? जाणून घ्या यामागची मोठी कारणं

वटपौर्णिमेनिमित्त साडीवर खुलून दिसतील 'या' 5 लेटेस्ट नथ डिझाइन्स

Maharashtra : महाराष्ट्रातील २०० भाविक काठमांडूमध्ये अडकले; सरकारकडे मदतीची आर्त हाक

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत निलेश सांबरे हे विजयी

cabinet reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? काय आहे मोदींचा मेगा प्लॅन, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT