Kalyan Crime Saam TV
क्राईम

Kalyan Crime: माजी कुलगुरू अशोक प्रधान यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट; निलंबित प्राध्यापक संजय जाधव पोलिसांच्या ताब्यात

Ashok Pradhan News: पहाटे निलंबित प्राध्यापक संजय जाधव यांना कल्याण महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Abhishek Deshmukh

Kalyan Crime:

मुंबई विद्यापीठाचे ८४ वर्षीय माजी कुलगुरू अशोक प्रधान यांच्या घरात घुसून निलंबित प्राध्यापकांसह ६ जणांनी हल्ला केल्याची घटना कल्याण पश्चिम भागातील कर्णिक रोडवरील प्रधान बंगल्यात घडली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात ६ हल्लेखोरांविरुधात विविध कलामाअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केलाय. आज पहाटे निलंबित प्राध्यापक संजय जाधव यांना कल्याण महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे प्रकरण

अशोक प्रधान यांनी मुंबईतील रूपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, कल्याण जनता बँकेचे विश्वस्त, कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, अशी पदे भूषवली आहेत. कल्याण पश्चिमेतील कर्णिक रोडला असलेल्या प्रधान बंगल्यात गेल्या अनेक वर्षांपासून ते राहत आहेत.

संजय जाधवांनी कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळेत शिक्षक म्हणून काम पाहिलंय. तक्रारदार अशोक प्रधान हे या संस्थेचे अध्यक्ष असताना शाळेतील गैरवर्तुणुकीवरून जाधव यांना निलंबित करण्यात आले होते. त्याचा राग जाधव यांच्या मनात होता.

रविवारी संध्याकाळी संजय जाधव हे त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रधान यांच्या कर्णिक रोडवरील घरी आले. ओळख असल्याने प्रधान यांनी त्यांना घरात घेतले. जाधव यांच्यासोबत अन्य तीन जण आणि एक महिला होत्या. सुरूवातीला संजय जाधव यांनी प्रधान यांना आपली नोकरी गेल्याने आपली परिस्थिती खूप हलाखीची झाली आहे, असे सांगितले.

2017 पासून छत्रपती शिक्षण मंडळाच्या कमिटीने चौकशी समिती बसवून मला शिक्षक पदावरून बडतर्फ केलेले आहे. दरम्यानच्या काळात माझे उत्पन्नाचे काही एक साधन नाही. शिक्षणाकरिता माझ्याकडे पैसे नाहीत. तसेच माझ्या घरावर जप्ती आलेली आहे. मला त्या संस्थेत एक लाख रूपये पगार होता. सद्या उदरनिर्वाहाकरिता काहीही एक साधन नाही, असं संजय जाधव म्हणाले.

आपल्या शिफारसीने मला छत्रपती शिक्षण मंडळामध्ये पूर्व पदावर नोकरी मिळावी या करिता आपल्याला मी विनंती करत असल्याचेही जाधवांनी सांगितले. त्यावर अशोक प्रधान यांनी जाधव यांची समजूत घालत म्हटलं की, माझा आता सदर संस्थेमध्ये काही एक संबंध नाही, असे बोलून नकार दिला.

मी काही करू शकत नाही, असं सांगत त्यांनी मदत करण्याचं टाळलं. याचाच राग आल्याने संजय जाधव यांच्यासह चार जणांनी अशोक प्रधान यांना बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर आत काय घडले आहे याचा कुणाला थांगपत्ता लागू नये यासाठी आरोपींनी बंगल्याच्या दरवाजाला बाहेर कडी लावून तेथून पळ काढला. या प्रकरणी आता निलंबित प्राध्यापक संजय जाधव यांना कल्याण महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivrajyabhishek Sohala Raigad: शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू; हजारो शिवभक्त रायगडावर दाखल

Accident: मामाच्या गावाकडे जाताना काळाचा घाला, ट्रकच्या चाकाखाली चिरडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

Palghar Accident : बोइसर-चिल्हार महामार्गावर भीषण अपघात; २८ वर्षीय डॉक्टर महिलेचा मृत्यू

महिलांना मोठा धक्का! फुले वाड्यात वटपौर्णिमेची पूजा बंद; राज्य सरकारचा निर्णय, कारण काय?

Satara Fort : वाईजवळील ऐतिहासिक वैभव, सह्याद्रीच्या कुशीत लपलाय 'हा' भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT