Crime against minor - Saam Tv
क्राईम

Crime news: जबरदस्तीने टेम्पोमध्ये कोंबलं, जंगलाजवळ नेत बीयर पाजून केला बलात्कार; अल्पवयीन मुलीवर २ तरूणांकडून अत्याचार

Crime against minor: मेरठमध्ये १३ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. पीडितेवर वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मेरठमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लिसाडी गेट परिसरात १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं दोन स्थानिक तरुणांनी जबरदस्तीने अपहरण केलं. इतकंच नाही, तर तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केल्याची माहिती आहे.

नेमकी घटना काय घडली?

नातेवाईकांनी माहिती दिली की, बुधवारी दुपारी मुलगी घरातून भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्याच वेळी २३ वर्षीय उवैश आणि त्याचा २६ वर्षीय साथीदार सुहेल यांनी तिला जबरदस्तीने टेम्पोमध्ये बसवलं. यानंतर तिला जंगलाजवळील वीज बंबा बायपास परिसरात नेण्यात आलं. तिथे मुलीला जबरदस्तीने बीयर पाजण्यात आली आणि त्यानंतर उवैशने तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेची स्वतः केली सुटका

रात्री उशिरा मुलगी कशीबशी तिथून पळून घरापर्यंत पोहोचली. तिने घडलेली घटना तिच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबाने तातडीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

मुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटक

तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी उवैशला अटक केली आहे. तर या घटनेतील दुसरा आरोपी सुहेल सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. या गुन्ह्यात वापरलेला टेम्पो शोधण्याचंही काम पोलिसांकडून सुरू आहे.

कोतवाली क्षेत्राचे सर्कल ऑफिसर अभिषेक पटेल यांनी सांगितलं की, पीडितेला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. तर इंस्पेक्टर अशोक यादव यांनी सांगितलं की, मुलीने दिलेल्या जबाबात उवैशवर बलात्काराचा आरोप केला आहे.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT