Faridabad Crime  Saam Tv
क्राईम

Crime: ३२ सेकंदात ३४ वेळा चाकूने वार, शिक्षिकेची शाळेबाहेर हत्या; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Faridabad teacher stabbed 34 times outside school: शाळेच्या बाहेर शिक्षिकेची निर्घृण हत्या करण्यात आली. चाकूने १ -२ वेळा नाही तर तब्बल ३४ वेळा वार करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Priya More
  • हरियाणाच्या फरीदाबादमध्ये शिक्षिकेची शाळेबाहेर हत्या

  • ३२ सेकंदात ३४ वार करत शिक्षिकेला संपवलं

  • शिक्षिकेच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

  • आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू

हरियाणाच्या फरिदाबादमध्ये शिक्षिकेची निर्घृण हत्या करण्यात आली. शाळेबाहेर या शिक्षिकेवर चाकूने सपासप वार करण्यात आले. ही थरारक घटना शाळेबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिस ठाण्याजवळच ही घटना घडली. या घटनेमुळे हरियाणात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फरीदाबादच्या सिकरौना गावात पोलिस ठाण्याच्या काही मीटर अंतरावर असलेल्या शाळेबाहेर ही घटना घडली. तोंडाला कपडा बांधून आलेल्या तरुणाने या महिला शिक्षिकेला शाळेबाहेर बोलावून घेतलं. सोबत आणलेल्या चाकूने आरोपीने शिक्षिकेवर ३२ सेकंदामध्ये ३४ वेळा वार केले. शिक्षिकेची हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. हत्या करण्यात आलेल्या शक्षिकेचे नाव संध्या होते. ती सिकरौना येथे एका खासगी शाळेत शिक्षिका होती.

सोमवारी सकाळी संध्या नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. काही मिनिटांनंतर त्याठिकाणी आरोपी तोंडाला कपडा बांधून येतो. तो शाळेबाहेर संध्या नावाच्या शिक्षिकेची विचारपूस करतो. तिचा नवरा आला आहे असे सांगून तो तिला बाहेर बोलावून घेतो. शिक्षिका शाळेबाहेर जशी येते तसं आरोपी तिच्यावर चाकूने हल्ला करतो. तो संध्याच्या मानेवर आणि शरीरावर चाकूने सपासप वार करतो. संध्या स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते पण आरोपी एकापाठोपाठ एक असे अनेक वेळा वार करत जातो.

संध्याच्या किंचाळ्या आणि ओरडण्याचा आवज ऐकून शाळेतील कर्मचारी तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात पण आरोपी त्यांच्या दिशेने चाकू घेऊन धावत जातो. त्यामुळे ते घाबरले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संध्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शाळेत सध्या भीतेचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT