Baramati Crime Saam tv
क्राईम

Crime: माझ्या जागेत बाथरूम का बांधलं? जाब विचारल्यानं काका चिडला; पुतण्याला संपवलं, बारामती हादरलं

Baramati Crime: बारामतीमध्ये भयंकर घटना घडली. काकाने पुतण्याची निर्घृण हत्या केली. माझ्या जागेत बाथरून का बांधले? हा जाब विचारल्यामुळे वाद झाला. या वादानंतर हाणामारी झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

Priya More

बारामतीमध्ये काकाने पुतण्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माझ्या जागेत बाथरूम का बांधले? असा जाब विचारल्यामुळे संतप्त झालेल्या काकाने पुण्याला बेदम मारहाण केली. बारामती तालुक्यातील पारवडीमध्ये बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बाथरूम बांधल्याच्या वादातून काका आणि त्याच्या मुलाने पुतण्याला मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा जीव गेला. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथील इंगळे वस्तीवर बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये सौरभ विष्णू इंगळे (२४ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात तालुका पोलिसांनी प्रमोद रामचंद्र इंगळे आणि रामचंद्र जगन्नाथ इंगळे या दोघांना रात्री उशिरा अटक केली. महत्वाचे म्हणजे सौरभला मारहाण केल्यानंतर प्रमोद इंगळे आणि रामचंद्र इंगळे या दोघांनी तालुका पोलिस ठाण्यात येऊन सौरभविरोधात फिर्याद देऊन दिली होती. मात्र यादरम्यान मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सौरभला बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.

पोलिसांनी सांगितले की, बाथरूम माझ्या जागेत बांधले असा सौरभचा दावा होता. यावरून इंगळे वस्तीवर सौरभ इंगळेने प्रमोद आणि रामचंद्र इंगळे यांना जाब विचारला. याचे पर्यावसन भांडणात झाले. या भांडणात प्रमोद इंगळे आणि रामचंद्र इंगळे या दोघांनी सौरभला बेदम मारहाण केली. सौरभच्या चुलत भावांनी सौरभला बारामती दवाखान्यात आणले. या दरम्यान आपल्याला मारहाण होत असल्याची माहिती देखील सौरभने पोलिसांना दिली होती.

बारामतीतील दवाखान्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. तोपर्यंत प्रमोद इंगळे आणि रामचंद्र इंगळे हे दोघे जण बारामती तालुका पोलिस ठाण्यात आले होते आणि त्यांनी सौरभविरोधात फिर्याद दिली. मात्र या दरम्यानच्या काळात सौरभचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी प्रमोद इंगळे आणि रामचंद्र इंगळे या बापलेकाविरोधात गु्न्हा दाखल करत त्यांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Mall threat : पुण्यातील मॉल उडवून देण्याची धमकी, तो मेल कोणी केला?

Pune BJP : भाजपचा स्थापना दिवस अन् अनधिकृत फ्लेक्सची बजबजपुरी, पुणे महापालिका कारवाई करणार?

Kalyan Tourism : कल्ला मस्ती ऑन द वे! वीकेंडला फिरा 'कल्याण'जवळील 'हे' पिकनिक स्पॉट्स, प्लान करा Summer ट्रिप

राजकारणात बदलाचे संकेत! २८८ नव्हे तर असतील ३५० आमदार; ५४४ ऐवजी असणार ६५० खासदार,MP, MLAची संख्या वाढणार?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील भोंदू अशोक खरात यांच्या कार्यालयात पुन्हा एसआयटीच पथक दाखल

SCROLL FOR NEXT