Kalyan Crime News SAAM DIGITAL
क्राईम

Crime News: पतीच्या अनैतिक संबंधाला कटांळून २५ वर्षीय विवाहितीने उचललं टोकाचं पाऊल, परिसरात खळबळ

Kalyan Crime News: पती- पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना कल्याण येथे घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kalyan Crime News

पती- पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना कल्याण येथे घडली आहे. आपल्या पतीच्या अनैतिक संबंधाला कटांळून २५ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी जावयाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. .('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला कल्याणमध्ये वास्तव्याला होती. तिचा पती एका शिपींग कंपनीत कामाला आहे. त्यामुळे त्याला सतत युक्रेनला जावं लागतं. या दरम्यान त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध जुळून आले. यातुनच या पती पत्नीच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मयत महिलेने साधारण सप्टेंबरमध्ये आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबतचे फोटो पाहिले होते

त्यानंतर तिने पतीच्या विवाहबाह्य संबंधांला आणि युक्रेनलाही जाण्यास विरोध केला होता. मात्र ८ नोव्हेंबर रोजी त्याने पत्नीला फसवले. मुंबई येथील कार्यालयात जात असल्याचे सांगून तो युक्रेनला परस्पर निघून गेला. युक्रेनला पोहचल्यानंतर त्याने पत्नीला मेसेज पाठवून, तो युक्रेनमध्ये आला आहे आणि परत भारतात येण्याचा कोणताही विचार नसल्यांच कळवलं होतं. त्यामुळे निराश झालेल्या पत्नीने आपलं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.( टाईम्स ऑफ इंडीयाच्या वृत्तानूसार)

आत्महत्येपूर्वी महिलेने आपल्या जवळील मित्रांना मेसेजही केला होता. तसंच पती परत भारतात येत नसल्याची माहिती तिने आपल्या आईला दिली होती. दरम्यान पत्नीच्या आत्महत्येची बातमी समजताच पती युक्रेनहून कल्याणला आला होता. दरम्यान पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतील अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे

Patole Recipe : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

80s Style Shirt Designs: ८०s शर्ट डिझाइन्स पुन्हा ट्रेंडमध्ये! 'या' ७ रेट्रो स्टाइल्सने मिळवा हटके आणि स्टायलिश लूक

India Fort : तीन रहस्यमयी दरवाजे असलेला ऐतिहासिक किल्ला, प्रत्येक द्वारामागे दडलीय वेगळी गोष्ट

Amit Shah: समान नागरी कायद्यावर केंद्राचा मोठा निर्णय; मुंबईत अमित शहांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT