Dhule Crime News  Saam TV
क्राईम

Dhule Crime: घरफोडी करणारी टोळी जेरबंद, शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई, मुद्देमालासह शस्त्रसाठा जप्त

Gangappa Pujari

भूषण अहिरे, धुळे|ता. १९ जानेवारी २०२४

Dhule News:

घरफोडी करणाऱ्या पाच कुख्यात चोरट्यांना जेरबंद करण्यात शिरपूर पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून यापूर्वी त्यांनी घरफोडी केलेल्या चांदीच्या भांड्यांसह मोठा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, त्याचबरोबर या चोरट्यांकडून बंदुकीसह ईतर शस्त्र देखील हस्तगत केले आहेत. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथील या चोरट्यांच्या टोळीने सांगली तालुक्यात मोठी घरफोडी केली होती. हीच टोळी शिरपूर येथे देखील घरफोडीच्या उद्देशाने आली असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून शिरपूर पोलिसांना माहिती मिळाली होती.

या माहितीच्या अनुषंगाने शिरपूर पोलिसांनी सापळा रचून या पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करीत शस्त्रास्त्र देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे शिरपूरमध्ये या चोरट्यांचा घरफोडीचा कट पोलिसांनी उधळाला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 भंडाऱ्यातही चोरी करणारी टोळी जेरबंद

भंडाऱ्याच्या चिखला (Chikhala) खाण परिसरात तब्बल ७४ हजारांचे साहित्य चोरून नेणाऱ्या तीन जणांच्या टोळीला गाेबरवाही पाेलिसांनी (gobarwahi police) मोठ्या शिताफीने पकडले. राहुल झोडे, यशवंत सोनवाणे व समीर शेख (सर्व राहणार. चिखला) अशी या चोरट्यांची नावे असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT