DRI मुंबईची “ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत मोठी कारवाई.
तब्बल २३ कोटींचा ई-कचरा जप्त.
सूरतमधील मास्टरमाईंडला अटक.
संजय गडदे, साम प्रतिनिधी
देशात बेकायदेशीर मार्गाने ई-कचरा आणणाऱ्या रॅकेटवर DRI मुंबईने “ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत मोठी धडक कारवाई करत तब्बल २३ कोटींचा माल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध ई-कचऱ्याच्या आयातीचे रॅकेट उघड झाले असून, या प्रकरणातील सूरतमधील मास्टरमाईंडला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. कारवाईत एकूण १७,७६० जुने लॅपटॉप्स, ११,३४० मिनी/बेअरबोन CPU, ७,१४० प्रोसेसर चिप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत २३ कोटी रुपये इतकी आहे.
DRI च्या तपासात उघड झाले की, जुन्या आणि वापरलेल्या लॅपटॉप्स, CPU, प्रोसेसर चिप्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू “अॅल्युमिनियम ट्रीट स्क्रॅप” म्हणून घोषित करून, चार कंटेनरमध्ये लपवून Nhava Sheva पोर्टवर आयात करण्यात आल्या होत्या. घोषित मालाच्या रांगांच्या मागे हजारो लॅपटॉप्स, CPU व प्रोसेसर चिप्स दडवून ठेवले होते.
कारवाईत एकूण १७,७६० जुने लॅपटॉप्स, ११,३४० मिनी/बेअरबोन CPU, ७,१४० प्रोसेसर चिप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत २३ कोटी रुपये इतकी आहे. या सर्व वस्तू कस्टम्स कायदा १९६२ च्या कलम ११० अंतर्गत जप्त करण्यात आल्या.
विद्यमान परराष्ट्र व्यापार धोरण २०२३, ई-कचरा व्यवस्थापन नियम २०२२, आणि इलेक्ट्रॉनिक्स व IT वस्तू (अनिवार्य नोंदणी) आदेश २०२१ नुसार जुन्या व रिफर्बिश्ड इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात पूर्णपणे बंद आहे. या वस्तू सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणासाठी घातक ठरत असून देशातील स्थानिक उत्पादन उद्योगालाही गंभीर धोका निर्माण करतात.
आयातीच्या या बेकायदेशीर व्यवहारामध्ये थेट गुंतलेल्या सूरतस्थित आयात करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला DRI ने अटक केली आहे. तपासात तो नियोजन, खरेदी, आर्थिक व्यवहार आणि संपूर्ण तस्करीत सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे.या धडक कारवाईने पुन्हा एकदा स्पष्ट केले की DRI देशात घातक ई-कचऱ्याचा डंपिंग रोखण्यासाठी कटिबद्ध असून अशा अवैध व्यापाराविरोधात कठोर पावले उचलली जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.