Dombivli Crime News Saam Tv
क्राईम

Dombivli : डोंबिवलीत जबरी घरफोडी! बंद घरावर चोरट्यांची नजर, सेफ्टी डोअर तोडून ४० तोळे सोने लंपास

Dombivli Crime News : डोंबिवलीत लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घरात जबरी घरफोडी झाली. ४० तोळे सोने आणि ५० हजारांची रोकड चोरीस गेल्याची माहिती असून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • डोंबिवलीत बंद घरावर चोरट्यांचा डल्ला

  • ४० तोळे सोने आणि ५० हजारांची रोकड चोरी

  • मानपाडा पोलिसांकडून तपास सुरू

  • परिसरात घरफोड्यांच्या घटनांत वाढ

  • नागरिकांना सुरक्षा उपाययोजनांचे आवाहन

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

डोंबिवलीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेलेल्या एका कुटुंबियांच्या घरी जबरी घरफोडी झाली आहे. या घरफोडीत संबंधित कुटुंबियांच्या घरातून ४० तोळे सोने आणि ५० हजारांची रोकड लंपास करण्यात आली आहे. सदर घटना डोंबिवलीतील देसले पाडा येथील आर.पी. रेसीडेन्सीमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा परिसरातील आर.पी. रेसीडेन्सी येथे राहणारे अशिष रामधनी यादव हे आपल्या कुटुंबासह मूळ गावी उत्तर प्रदेश येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. जाताना त्यांनी घराची चावी तिची बहीण जी डोंबिवली सोनारपाडा परिसरात राहत असणाऱ्या मायादेवी यांच्याकडे सुरक्षिततेसाठी दिली होती. दरम्यान 9 फेब्रुवारी रोजी घरात पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले होते. त्यानंतर घर व्यवस्थित लॉक करून बंद करण्यात आले होते.

तसेच 15 फेब्रुवारी रोजी वॉटर फिल्टर दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ येणार असल्याने मायादेवी व त्यांचे पती दुपारी सुमारे 1 वाजता घरात गेले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.घराचे सेफ्टी डोअर व मुख्य दरवाजाची कडी तुटलेली होती. आत प्रवेश करून पाहणी केली असता दोन्ही बेडरूममधील कपाटे उघडी व लॉकर तोडलेले आढळले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले होते.घटनेची माहिती तात्काळ अशिष यादव यांना देण्यात आली.

प्राथमिक चौकशीत घरातील सुमारे 50 हजार रुपयांची रोकड तसेच अंदाजे 40 तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पोलिसांनी संभाव्य संशयितांचा शोध सुरू केला आहे.

मात्र अलीकडील काळात डोंबिवलीत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुट्टी किंवा लग्नसराईच्या काळात गावी जाणाऱ्या कुटुंबांच्या घरांवर चोरट्यांचा डोळा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी घर बंद ठेवताना अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना कराव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT