Crime News Saam Digital
क्राईम

Dombivli Crime: किरकोळ वादातून मित्रांनीच घात केला, तिघांनी मिळून तरुणाला संपवलं; डोंबिवलीतील घटनेने खळबळ

Crime News Update: विष्णूनगर पोलिसांनी अवघ्या 15 तासात योगेश डोंगरे ,विलन टावरे या दोघांना अटक केली. त्यांचा साथीदार दीपक करकडे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत .

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, कल्याण, ता. २८ नोव्हेंबर २०२३

Dombivli Crime News:

दारू पिल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून तीन मित्रांनी त्यांच्या एका मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघड झाली आहे. सोमनाथ शिंदे असे या मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी अवघ्या 15 तासात योगेश डोंगरे ,विलन टावरे या दोघांना अटक केली तर त्यांचा साथीदार दीपक करकडे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत .

डोंबिवली पश्चिम (Dombivli) देवीचापाडा खाडी किनारी येथे सोमवारी (२८, नोव्हेंबर) एका पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला होता. मृत तरुणाच्या डोक्यात मारहाणीच्या खुणा होत्या. ज्यावरुन पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता.

डीसीपी सचिन गुंजाळ,एसीपी सुनील कुऱ्हाडे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूनगर पोलिसांच्या पथकाने मृतदेहाची ओळख पटवली. सोमनाथ शिंदे असे मृताचे नाव असून तो डोंबिवलीत राहणारा असल्याचे पोलीस तपासात समोर आले. मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रविवारी (२६, नोव्हेंबर) रात्री मृत तरुण सोमनाथ त्याचे मित्र योगेश डोंगरे ,विलन टावरे ,दीपक करकडे यांच्यासोबत दारु पिण्यास बसला होता. दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाले याच वादातून संतापलेल्या योगेश डोंगरे ,विलन टावरे ,दीपक करकडे यांनी दगडाने ठेचून त्याची हत्या करत तेथून पळ काढला होता. पोलिसांनी याप्रकरणी योगेश डोंगरे ,विलन टावरे या दोन जणांना अटक केली तर त्यांचा साथीदार दीपक करकडे पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT