Dombivali Crime Saam Tv
क्राईम

Crime: लग्न मोडल्याचा सूड, तरुणाने मामाच्या १ वर्षांच्या बाळाचं अपहरण केलं; नंतर...

Dombivali Crime: लग्न मोडल्याच्या रागातून एका तरुणाने मामाच्या बाळाच्या अपरहण केलं. त्याने डोंबिवलमध्ये जाऊन बाळाला रिक्षात ठेवून पळ काढला.

Priya More
  • लग्न मोडल्याच्या रागातून मामाच्या बाळाचे अपहरण

  • कुर्ल्यातून एक वर्षाच्या बाळाचे अपहरण

  • बाळाला डोंबिवलीत एका रिक्षात सोडून आरोपी फरार

  • सीसीटीव्हीच्या मदतीने बाळ सापडले

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

डोंबिवलीमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली. मामाने लग्नाला विरोध करून सोयरिक मोडल्याच्या राग डोक्यात गेला. एका मूकबधिर भाच्याने मामाच्या अवघ्या एक वर्षाच्या बाळाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली. कुर्ल्यातून पळवून नेलेल्या या चिमुकल्याला डोंबिवलीतील एका बंद रिक्षात सोडून आरोपी फरार झाला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे बाळ सुरक्षित सापडले असून आरोपीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला परिसरातून एक वर्षाचे बाळ अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे बाळाचे आई-वडील चिंतेत आले. त्यांनी बराच वेळ बाळाचा शोध घेतला पण ते सापडलं नाही. त्यामुळे बाळाचे वडील श्यामसुंदर कांबळे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

१५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केल्यानंतर बाळाला घेऊन जाणारा तरुण पोलिसांना दिसला. हा तरुण श्यामसुंदर कांबळे यांचा मूकबधिर भाचा अमन सकट असल्याचे समोर आले. लग्नाला विरोध करून सोयरिक मोडल्याच्या रागातून अमनने मामाला धडा शिकवण्यासाठी त्याच्या एक वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोप आहे. अपहरणानंतर त्याने चिमुकल्याला डोंबिवलीतील कोपर परिसरातील एका बंद रिक्षात सोडून पलायन केले.

डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांना हे बाळ सुरक्षित अवस्थेत आढळून आले. बाळाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच कुर्ल्यातील अपहरण प्रकरणाचा उलगडा झाला. सध्या बाळावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी अमन सकटचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - भुसावळमध्ये मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ; पोलिसांची रात्री वाहन तपासणी

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT