Beed Crime News Saam Tv
क्राईम

Ranjeet Kasle : झुकेगा नहीं.. बीडच्या रणजीत कासलेच्या मुसक्या आवळल्या, अटक करताच केली पुष्पाची स्टाईल

Beed Crime News : बीडमधील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला घरफोडी आरोपींना मदत केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी लातूरमधून अटक केली आहे. दोन दिवसांच्या शोधानंतर ही कारवाई करण्यात आली.

Alisha Khedekar

  • बीडचा बडतर्फ पोलीस PSI रणजीत कासले पुन्हा अडचणीत

  • गुजरात पोलिसांनी लातूरमधून मध्यरात्री कारवाई करत अटक केली

  • घरफोडी आरोपींना मदत केल्याचा गंभीर आरोप केला आहे

  • कासलेवर यापूर्वीही ७ गुन्हे दाखल आहेत

बीड मधून मोठी बातमी समोर आली आहे. बीडमधील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याला पुन्हा मध्यरात्री गुजरात पोलीसांनी लातूरमधून अटक केली आहे. घर फोडीतील आरोपींना मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी कासले याला ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपासून पोलीस कसलेच्या मागावर असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेने नवा कारनामा केला आहे. गुजरातमधील जबरी घर फोडीतील आरोपींना मदत केल्याच्या संशयावरून कासले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुजरात पोलिसांनी दोन दिवसांपासून कासलेच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरु केली होती. अखेर लातूर पोलीस आणि गुजरात पोलीसांच्या एकत्रित मोहीमेला यश आले असून आज मध्यरात्री कासलेला ताब्यात घेण्यात आले.

लातूर येथून कासलेला ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर लातूर पोलिसांनी गुजरात पोलिसांकडे त्याचा ताबा दिला आहे. पोलिस त्याला गुजरातला घेऊन गेले आहेत. सूरत आणि आजुबाजूच्या परिसरात जबरी घरफोड्या आणि चोऱ्या करणाऱ्या आरोपींकडून रणजित कासलेची माहिती पोलिसांना मिळाली. या आरोपींनी गुजरात पोलिसांना सांगितले की, रणजीत कासलेने आपल्याला मदत आणि इतर सहकार्य केले. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. कासलेचा माग काढला आणि अखेर तो लातूरमध्ये असल्याचा ठावठिकाणा लागला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील म्होरक्या वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची कासले याला ऑफर मिळाली असल्याचे त्याने म्हटले. त्यानंतर त्याने असा गौप्यस्फोट केला की, ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी त्याला दहा लाखांची ऑफर होती. कासलेच्या या वादग्रस्त विधानानंतर पोलिसांनी सापळा रचून रणजित याला अटक केली. शिवाय त्याला बडतर्फ करण्यात आले. रणजीत कासलेवर आतापर्यंत ७ गुन्हे दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - वाघोलीत कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

Rohit Pawar : दोन्ही पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

मातोश्रीत भाजपच्या माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; नरकासुराचा वध करण्यासाठी आला-उद्धव ठाकरे|VIDEO

Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनाला सोने-चांदीऐवजी या ४ वस्तू घरी आणा; वर्षभर पैशांची कमी जाणवणार नाही

Boss Gifts Car: बॉस नाही भगवान! कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्टमध्ये दिल्या महागड्या कार; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT