Missing  Saam Tv
क्राईम

Missing News: दिव्यांगांच्या दारी कार्यक्रमातून दिव्यांग मुलगी बेपत्ता; सेवाग्राम ठाण्यात तक्रार दाखल

Missing : दिव्यांगांच्या दारी’या कार्यक्रमासाठी आलेली दिव्यांग मुलगी बेपत्ता झालीय.

Bharat Jadhav

चेतन व्यास, वर्धा.

Missing News:

सेवाग्राम येथे आयोजित दिव्यांगांच्या दारी कार्यक्रमात आपल्या आई-वडिलांसोबत आलेली एक दिव्यांग मुलगी बेपत्ता झालीये. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सेवाग्राम ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. रूक्साना परवीन शेख चांद शेख असं या मुलीचं नाव आहे. (Latest News)

सेवाग्राम येथे बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आयोजित ‘दिव्यांगांच्या दारी’या कार्यक्रमासाठी ही मुलगी आली होती. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली होती. जिल्हा प्रशासनाकडून लाभार्थ्यांना ने-आण करण्यासाठी विनामुल्य वाहनांची व्यवस्थाही केली होती. कारंजा तालुक्यातील पारडी येथून जवळपास ३० जण आलेले होते. यात रूक्साना परवीन शेख चांद शेख (२७) ही दिव्यांग मुलगी तिच्या आईसोबत आलेली होती.

कार्यक्रमस्थळी आल्यानंतर तिची आई तिला घेऊन स्टॉलवर नोंदणी करीत असतानाच आईच्या हातातून मुलीचा हात सुटला. नोंदणी प्रक्रिया आटोपून रुक्सानाची आई परत त्या ठिकाणी गेली असता तिला मुलगी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही रुक्साना मिळून न आल्याने आई रेहना बी शेख चांद शेख यांनी सेवाग्राम पोलिसात मुलगी हरविल्याची तक्रार दिली.

कार्यक्रमात आलेल्या प्रफुल्ल झाटे या दिव्यांगाने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही सगळे तीन वाहनांतून सेवाग्रामला गेलो. सोबत ग्रा.पं.चा कोणताही कर्मचारी नव्हता. रुक्साना हरविल्याने आम्ही सेवाग्राम ठाण्यात तिच्या आईसोबत गेलो, तक्रार दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT