Dhule Crime Saam Tv
क्राईम

Dhule Crime: नशेचं औषधं विकणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश; गुंगीकारक औषधाचा मोठा साठा जप्त

Dhule Crime: धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने नशेचं औषधं विकणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश केलाय. एलसीबीने या प्रकरणात ४ जणांना ताब्यात घेतलं आहे. गुन्हे शाखेने या कारवाईत ४ जणांकडून गुंगीकारक औषधाच्या सुमारे ५८० बाटल्या जप्त केल्या आहेत.

Bharat Jadhav

(भूषण अहिरे)

Dhule Local Crime Branch :

धुळ्यातील पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नशेचं रॅकेट उद्धवस्त केले आहे. पोलिसांनी गुंगीकारक औषधाचा मोठा साठा जप्त केलाय. गुन्हे शाखेने या कारवाईत ४ जणांकडून गुंगीकारक औषधाच्या सुमारे ५८० बाटल्या आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ५ हजाराहून जास्तीच्या गोळ्या हस्तगत केल्या आहेत.(Latest News)

राज्यात ललित पाटील ड्रग्स प्रकरण चर्चेत असताना ही कारवाई झाल्याने धुळे पोलिसांची ही कारवाई मोठी मानली जात आहे. या नशेच्या रॅकेटमध्ये मेडिकल चालकासह एमआरचाही सहभाग असल्याने या चौघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे. हे पुढील तपासात समोर येईल. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण (Local Crime Investigation) विभागातर्फे करण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार, एलसीबीने (Local Crime Investigation) मोहाडी हद्दीतून एका इसमाला ताब्यात घेतले होते. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गुंगीकारक औषधाच्या बाटल्या आढळून आल्या. सदर बाटल्या जप्त करण्यात आल्यानंतर या बाटल्यांबाबत त्याच्याकडे चौकशी केली. देवपुरातील विष्णू नगरातील मेडिकलवर काम करणाऱ्या तरुणाकडून या बाटल्या आणल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

त्यानुसार एलसीबीच्या पथकाने मेडिकलवरील तरुणालाही ताब्यात घेतलं, त्याच्याकडून देखील गुंगीकारक औषधांच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. यात वाडीभोर परिसरातील राहणाऱ्या एमआरचाही सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली, त्यानुसार त्याचा देखील शोध पोलिसांनी घेतला असता त्याच्याकडेही गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांचा साठा पोलिसांना आढळून आला. नशेच्या बाजारातील या चौघांच्या मुसक्या आवळल्यानंतर या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT