Child Marriage saam tv
क्राईम

Child Marriage: अल्पवयीन मुलीचं लग्न लावणं पडलं महागात, वधू-वरच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल

Dhule Crime News: धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात अल्पवयीन मुला मुलीचे लग्न लावून देणाऱ्या दोघाही कुटुंबीयांना हे लग्न चांगलंच महागात पडलं आहे.

Satish Kengar

>> भूषण अहिरे

Dhule Crime News:

धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात अल्पवयीन मुला मुलीचे लग्न लावून देणाऱ्या दोघाही कुटुंबीयांना हे लग्न चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी मुलगा आणि मुलीच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरामध्ये गेल्या वर्षी अल्पवयीन मुलीला तिच्या नात्यातील अल्पवयीन मुलाने घरातून पळून नेले होते. त्यानंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार झाल्यानंतर ती मुलगी गर्भवती राहिल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर, या दोघाही अल्पवयीन मुला मुलीचे कुटुंबीयांनी लग्न लावून दिले होते. (Latest Marathi News)

परंतु सासरकडील मंडळी मुलीला व्यवस्थित वागवत नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र या तक्रारीनंतर चाळीसगाव रोड पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली असता, या दोघेही अल्पवयीन मुला मुलीचे कुटुंबीयांनीच लग्न लावून दिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.

ही बाब उघडकीस आल्यानंतर या दोघाही कुटुंबीयांवर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

आभाळ फाटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पुरात २२ जणांचा मृत्यू, १५ जण अजूनही बेपत्ता

Numerlogy Prediction : मूलांक ३ वर पैशांचा पाऊस, मूलांक ५ ची होणार प्रगती; जन्म तारखेवरून जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Navi Mumbai: कारवाईला कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? बेकायदा इमारत प्रकरणी हायकोर्टाचा एकनाथ शिंदेंना सवाल

SCROLL FOR NEXT