Dule Crime News Saam Digital
क्राईम

Dhule Crime News : धक्कादायक ! शेतात सुरू होता भलताच प्रकार, पोलीस अधिकारी जाऊन धडकले, दृश्य बघून चक्रावले

Dhule Crime News: शिरपूर तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील लाकड्या हनुमान परिसरातील एका मळ्यात चक्क गांज्याची शेती पिकवली जात होती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे, धुळे

Dhule Crime News

शिरपूर तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील लाकड्या हनुमान परिसरातील एका मळ्यात चक्क गांज्याची शेती पिकवली जात होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक याठिकाणी पोहोचले तेव्हा तेही चक्रावून गेले. दरम्यान पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण गांजाचा मळा नष्ट केला असून तब्बल ३ कोटी १० हजार रुपये किमतीचा गांज्याचा साठा जप्त केला आहे.

लाकड्या हनुमान परिसरात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात गांज्याची शेती केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. खात्रीशीर माहितीदाराने ही माहिती दिली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून या संदर्भातील खातरजमा करून घेतली असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गांज्याची शेती पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी ही शेती नष्ट केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थासंदर्भात माहिती नागरिकांना असेल, तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT