dharashiv police arrests thieves in petrol pump loot case Saam Tv
क्राईम

धाराशिव : पेट्राल पंप लूटीसह विविध गुन्ह्यातील आराेपींना अटक, मुद्देमाल जप्त

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv :

धाराशिव जिल्ह्यातील कळंब परिसरात अवघ्या 20 दिवसांत शस्त्राचा धाक दाखवून केलेली पेट्रोल पंपावरील लुट, एटीएम मशिनसह लंपास केलेली ३३ लाखांची रोकड व एकाच रात्रीत केलेल्या तीन दुकानांतील चाेरी या सर्व गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात धाराशिव पोलिसांना (dharashiv police) यश आले आहे. विविध गुन्ह्यातील आरोपींना पाेलिसांनी अटक केली आहे. (Maharashtra News)

धाराशिव जिल्ह्यातील मस्सा येथे कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा घालण्यात आला हाेता. समर्थ पेट्रोलियम येथील दोन कामगारांना मारहाण करण्यात आली हाेती. त्यांच्याकडून दोन मोबाईलसह ४५ हजाराची रोख रक्कम लूटण्यात आली हाेती.

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव पाेलिसांची विविध ठिकाणे पथक चाेरट्यांचा शाेध घेत हाेती. विविध गुन्ह्यातील संशयितांच्या मागावर पाेलिस हाेते. पाेलिसांनी आरोपींना नुकतेच गजाआड केले. त्यांच्याकडुन मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी साम टीव्हीला दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT