Dombivali Crime News Saam tv
क्राईम

Dombivali Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला; डोंबिवलीतील पहाटेची घटना

Dombivali News : राजू हिवाळे हा पत्नी सुरेखा हिच्या चरित्र्यावर कायम संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास देखील या दोघांमध्ये वाद झाला

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख

कल्याण : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असलेल्या पतीने चाकूने प्राण घातक हल्ला केल्याची घटना डोंबिवली (Dombivali) नांदिवली टेकडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर (Mumbai) मुंबई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीवर हल्ला करून पती राजू हिवाळे हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Live Marathi News)

डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली टेकडी परिसरात राजू हिवाळे व सुरेखा हिवाळे हे दोन्ही मुलांसह वास्तव्यास होते, राजू हिवाळे हा पत्नी सुरेखा हिच्या चरित्र्यावर कायम संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. (Dombivali Crime News) दरम्यान आज पहाटेच्या सुमारास देखील या दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून संतापलेल्या राजू याने सुरेखा हिच्या पोटावर चाकूने वार केले. या हल्ल्यात सुरेखा गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी मुंबई येथील सरकारी रुग्णालयात दाखल (Crime News) करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फरार पतीचा पोलिसांकडून शोध 

सदर घटनेनंतर पती राजू हा पसार झाला आहे. याप्रकरणी राजू हिवाळे यांच्या मुलाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी राजू हिवाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस राजू याचा शोध घेत आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, एकाच कुटुंबातील तिघांसह ६ जणांचा मृत्यू

Terror Attack : जम्मू- काश्मीरमध्ये मोठा दहशवादी हल्ला, नाव विचारून गोळ्या झाडल्या; 2 जणांचा मृत्यू

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या वर्षभरातच गाशा गुंडाळला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT