Dharashiv Crime News Saam Tv
क्राईम

Dharashiv Crime : जन्मदात्याला संपवलं, मृतदेह नदीत फेकला, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत मुलाच्या मुसक्या आवळल्या!

Bhoom Crime News: पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना घडली आहे. भुम तालुक्यातील आंतरगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण आंतरगाव सुन्न झालं आहे.

Satish Kengar

बालाजी सुर्वे, साम टीव्ही, प्रतिनिधी

धाराशिवमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना घडली आहे. भुम तालुक्यातील आंतरगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण आंतरगाव सुन्न झालं आहे.

परंडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपाला अटक केली आहे. विजय उर्फ बोधीराम विक्रम गोरे, असं आरोपीचे नाव आहे. आपण रागाच्याभरात वडिलांची हत्या केली असल्याची कबुली या आरोपी मुलाने पोलिसांना दिली आहे.

पोलीस जेव्हा आरोपी विजयला अटक करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्याच्या हातात लोखंडी शस्त्र होतं. पोलिसांना बघून आरोपी हे शस्त्र घेऊन त्यांच्या दिशेने धावून आला होता. नंतर त्याने पळ काढला. पोलिसांनी सिनेस्टाईल तीन ते चार किलोमीटरचा पाठलाग करुन पकडले आणि त्याला बेड्या ठोकल्या.

मिळाली माहितीनुसार, आरोपी विजय हा आपल्या वडिलांसोबत आंतरगाव येथे राहत होता. 8 ऑगस्ट रोजी विजयाचा त्याच्या वडिलांसोबत कोणत्या तरी शुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याच क्षणी विजय याने आपल्याच वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला.

त्याने कसला ही विचार न करताना रागाच्याभरात आपल्याच वडिलांची हत्या केली. यानंतर आरोपी विजयने हा गुन्हा लपवण्यासाठी त्याच्या वडिलांचा मृतदेह नदीत फेकून दिला. मात्र दोन दिवसानंतर ही घटना उघड झाली. यानंतर पोलिसांनी आरोपी विजयला अटक केली आहे. विजयने आपल्याच वडिलांची हत्या का केली, नेमकं काय घडलं होतं? याची चौकशी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge Plan: Jioचा फक्त १२५ चा प्लान, कॉलिंग अन् डेटासह मिळणार खूपकाही फायदे

Sanai Chaughade: ३०० कोटींची मालकीण पुन्हा छोट्या पडद्यावर? 'सनई चौघडे' मालिकेत येणार नवा ट्विस्ट

Green Mango Chutney: नेहमीची हिरवी चटणी नकोय? मग ट्राय करा 'कैरीची लाल चटणी'; न खाणारेही खातच राहतील

Maharashtra News Live Update: मालेगावच्या भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

Maharashtra Politics: PM मोदींच्या आवाहनानंतर सरकारचा मोठा निर्णय, १२ आमदारांचा परदेश दौरा तातडीने रद्द

SCROLL FOR NEXT