Police investigate the crime scene after a युवक was fatally stabbed by his nephew in South Delhi. Saam Tv
क्राईम

दिल्ली हादरली! आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय; भाच्याने मामाला संपवलं

Nephew Kills Uncle Over Suspected Illicit Relationship In Delhi: दिल्लीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली असून आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भाच्याने मामाची निर्घृण हत्या केली.

Omkar Sonawane

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आपल्या आईसोबत मामाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने भाच्याने थेट मामाची हत्या केली आहे. या घटनेमुळे राजधानी हादरून गेली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची ओळख दक्षिण दिल्लीतील मदनगीर येथील रहिवासी, २२ वर्षीय अमन कुमार अशी पटली आहे.

अमन व्यवसायाने सुतार होता आणि तो त्याचा भाऊ सुमितसोबत काम करत असे. आरोपी, रोहित (१८), हा अमनच्या चुलत भावाचा मुलगा होता. पोलीस उपआयुक्त विक्रम सिंह यांनी सांगितले की, अमन आणि त्याच्या आईचे अनैतिक संबंध असल्याचा रोहितला बऱ्याच काळापासून संशय होता. याच संतपातून त्याने त्याच्या मामाचा खून केला.

शनिवारी अमन त्याच्या बहिणीला भेटायला निहाल विहारला गेला असताना ही घटना घडली. घरी काही वेळ घालवल्यानंतर तो आणि त्याची बहीण वेस्ट विहारकडे निघाले. ते वाटेत असतानाच रोहितने अचानक त्यांचा रस्ता अडवला. अमनला काही बोलण्यापूर्वीच, रोहितने त्याच्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला, त्यामुळे तिथे असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली. यावेळी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

रक्ताने माखलेल्या अमनला तातडीने संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वार इतके खोलवर होते की रुग्णालयात पोहोचताच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी माहिती घेतली. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी रोहितचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली असून लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चुकीच्या मार्गाने १०० रुपये कमवाल, तर जागा तुरुंगातच!" पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना दम

Accident News : अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात; नववी-दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कार उलटली

Pod Taxi : प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबईकरांच्या सेवेत येणार पॉड टॅक्सी; कुठून कुठे धावणार? वाचा

MI vs KKR: वानखेडे स्टेडियममध्ये भिडणार मुंबई इंडियन्स केकेआरचा संघ; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्ट

Akshaye Khanna: ल्यारीचा बादशाहा होणार राक्षस गुरु शुक्राचार्य; 'महाकाली'मधला अक्षय खन्नाचा अंगावर काटा आणणारा लूक लीक

SCROLL FOR NEXT