Delhi Girl Killed In Murtijapur Akola Saam Tv
क्राईम

Akola News: खळबळजनक! सोशल मीडियावरची मैत्री; दिल्लीतील तरुणीची अकोल्यात हत्या, घटनेनंतर मित्र फरार

Delhi Girl Killed In Murtijapur Akola: दिल्लीतील तरुणीची अकोल्यात हत्या झाल्याची घटना घडली आहे. डोक्यात अधिक वार झाल्यामुळे तरूणीचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

दिल्लीतील २६ वर्षीय तरुणीची अकोल्यात हत्या झाल्याचं समोर आलंय. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर शहरातील प्रतिक नगरात हे हत्याकांड घडलं आहे. सोबत राहणाऱ्यामित्रानेच तिचा खून केल्याचा संशय मूर्तिजापुर पोलिसांना आहे. तरुणीच्या डोक्यावर अधिक वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं काय होतं संपूर्ण प्रकरण?

शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे, तर कुणाल उर्फ़ सनी महादेव शृंगारे असं तिच्या सोबत राहणाऱ्या मित्राचं नाव आहे. दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली (Akola Crime News) होती. कुणालनं काम देतो म्हणून शांतीक्रियाला अकोल्यातल्या मूर्तिजापुर शहरात बोलावून घेतलं होतं. त्यानंतर दोघे सोबत राहू लागले होते. मात्र, काल २३ जुलै रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, अन् रागाच्या भरात कुणालने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार केले. यात तरूणीचा मृत्यू झाला. दरम्यान मृत शांतिक्रिया ही प्रसिद्द टॅटू आर्टिस्ट होती.

दिल्लीतील तरुणीची अकोल्यात हत्या

शांतिक्रीया २१ जुलै रोजी मुर्तीजापुर (Murtijapur) शहरात दाखल झाली होती. कुणाल तिला घेऊन वैशाली वाईन बारमध्ये काम मागण्यासाठी गेला होता. मात्र, बार मालकानं काम द्यायला स्पष्ट नकार दिला, त्यानंतर दोघेही तिथून (crime news) परतले. विशेष म्हणजे कुणाल पाच ते सहा महिन्यांपूर्वी याच बारमध्ये वेटरचं काम करत होता. त्यानंतर दोघेही प्रतिक नगरमध्ये खोली घेवून राहत होते. कुणालला दारू पिण्याचं व्यसन होतं. विशेष म्हणजे हत्येच्या घटनेपासून कुणाल फरार आहे, अशी माहिती मूर्तिजापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी 'साम'शी बोलतांना दिली.

हत्येच्या घटनेपासून मित्र फरार...

आज सकाळी घरमालक शुभम महाजन यांना खोलीत शांतिक्रियाचा मृतदेह दिसून (Girl Killed) आला. लागलीच त्यांनी या संदर्भात मूर्तिजापूर शहर पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्यास्थित पंचनामा करून मृतदेह वैद्यकिय तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. कुणालच्या शोधार्थ पोलिसांच्या स्थानिक शाखेचे पथक आणि स्थानिक पोलिसांचे विविध पथक रवाना करण्यात आलेत. लवकरच मारेकऱ्याला गजाआड करू, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT