Son Killed Father  Saam Tv
क्राईम

Raigad Crime : प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; संतापलेल्या तरूणीने आईला संपवले, बनाव रचला पण 'अशी'अडकली

Daughter Killed Mother In Khalapur : प्रियकरासोबत पाहिल्याने मुलीने जन्मदात्या आईची हत्या केल्याचं समोर आलंय. ही घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात घडलेली आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : रायगड जिल्ह्यात एका मुलीने स्वत:च्या आईची हत्या केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार खालापूर तालुक्यातून समोर आलाय. तरूणीने जन्मदात्या आईची हत्या का केली? असा प्रश्न सर्वांना पडतोय. ही घटना केव्हा घडली? आईची हत्या करण्यामागे काय कारण होतं? हे आपण सविस्तर जाणून घेवू या.

खालापूर तालुक्यातील परखंदे येथील धनगरवाडामध्ये मुलीने जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी घडली होती. संगीता मारुती झोरे, अशी मृत महिलेची ओळख (Daughter Killed Mother) आहे. तरूणी प्रियकरासोबत शरीरसंबंध करत होती. आईने तिला रंगेहाथ पकडल्यामुळे तरूणी प्रचंड संतापली. रागाच्या भरात या तरूणीने आईचा खून केलाय.

मुलीने जन्मदात्या आईची हत्या केली

आईच्या हत्या केल्याप्रकरणी खालापूर पोलिसांनी मुलगी भारती आणि तिचा प्रियकर संतोष दत्तात्रेय नांदगावकर यांना अटक केलीय. खालापूर न्यायालयाने या दोघांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली (Immoral Relationship) आहे. संगीता झारे त्यांच्या दोन मुलींसह धनगरवाडामध्ये राहत होत्या. त्यांची मोठी मुलगी भारतीचे वावोशीतील संतोष नांदगावकर नावाच्या तरूणासोबत प्रेम प्रकरण आहे. तो तिला अनेकदा भेटण्यासाठी तिच्या घरी जात होती.

आत्महत्येचा रचला बनाव

१० सप्टेंबर रोजी तरूणीचा प्रियकर संतोष हा तिच्या घरी आला (Raigad News) होता. रात्रीच्या वेळी दोघांना तरूणीच्या आईने एकत्र पाहिले. नंतर आई आरडेल या भितीने भारती आणि संतोष यांनी तिला खाली पाडलं. नाकावर घोंगडीने दाब देत आईची हत्या केली. घटनेनंतर त्यांनी आईने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. संगीता यांचा मृतदेह घरामधील चुलीच्या ठिकाणी असलेल्या पाइपला साडीचा फास लावून लटकवला होता. परंतु या दोघांनी केलेल्या भयंकर कृत्याची भारतीची लहान बहीण साक्षीदार (crime news) होती. त्यामुळे आरोपी तरूणीच्या लहान बहिणीने ही बाब पोलिसांना सांगितली. त्यामुळे या दोघांचं कृत्य उघड झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT