youth dies by suicide after cow vigilante assault and viral defamation post. Saam tv
क्राईम

Crime News: गोरक्षकांकडून मारहाण; सोशल मीडियावरील बदनामीमुळं तरुणानं संपवलं जीवन

Youth Killed Himself: लोणी गावातील एका तरुणाने गोरक्षकांकडून झालेल्या मारहाणीनंतर जीवन संपवले. समाजात बदनामी झालेल्यानं त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

Bharat Jadhav

  • लोणी गावात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

  • काही दिवसांपूर्वी गोरक्षकांनी भररस्त्यात त्याला मारहाण केली होती.

  • मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी गावात एका तरुणाने सोशल मीडियावर झालेल्या बदनामीमुळे मृत्यूला कवटाळलं. ही घटना लोणी पोलिस ठाणे हद्दीत घडलीय. गोरक्षकांनी भररस्त्यात तरुणाला काही दिवसापूर्वी मारहाण केली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यात पोस्टमध्ये गोरक्षकांनी त्याला हिंदू दलाल म्हणूण संबोधलं होतं.

तरुणाची बदनामी झाल्यामुळे आत्महत्या केल्याने नातेवाईकांनी लोणी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करा, अशी नातेवाईकांची मागणी आहे. काही दिवसापूर्वी काही गोरक्षकांनी एका टेम्पो पकडला होता. त्या टेम्पोमध्ये गायी होत्या. तर सदर तरुण हा टेम्पो चालवत होता. गोरक्षकांनी चालक तरुणाला पकडून मारहाण केली. त्याचा व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर एका मजकुरासह व्हायरल केला. त्यानंतर तरुणाने आत्महत्या केली.

सोमनाथ वडीतके असे या तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या नातेवाईकांनी लोणी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडलाय. सोमनाथ हा गायींची तस्करी करत नव्हता. चुकीच्या माहितीतून त्याच्यावर हल्ला झाला. त्याला राजुरी रोडवर गाई सोडण्याचं भाडे मिळालं होतं. तो गाई सोडण्यासाठी जात होता. परंतु गोरक्षकांनी त्याला वाटेत अडवून त्याला मारहाण केली. त्याचे व्हिडिओ बनवले.

त्यातून तरुणाची बदनामी झाली. या बदनामीमुळेच सोमनाथने आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केलाय. या आत्महत्या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amaravati Accident : भयंकर! दरीत कोसळणाऱ्या बसला अडवताना विपरीत घडलं, चालकाचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची जिल्हा कारागृहात दादागिरी; पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

Monday Horoscope : कामाची दगदग वाढेल; ५ राशींच्या लोकांच्या डोक्याचं टेन्शन वाढणार

'सोसायटी स्थापन न केल्यास थेट गुन्हा'; बिल्डरांना राज्य सरकारचा दणका

Maharashtra Live News Update: दर्यापूरच्या रामतीर्थ फाट्यावर चार चाकी वाहनाला भीषण आग

SCROLL FOR NEXT