Madhya Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: घरात घुसलेल्या चोरांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार, प्रायव्हेट पार्टवर हल्ला नंतर...

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशमध्ये घरात घुसून महिलेवर चोरट्यांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी आरोपींनी महिलेला मारहाण देखील केली.

Priya More
  • मध्य प्रदेशच्या अलीराजपूरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

  • घरात घुसून चोरट्यांनी महिलेसोबत केलं भयंकर कृत्य

  • आरोपींनी महिलेला मारहाण केली

  • महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला

मध्य प्रदेशमध्ये भयंकर घटना घडली. घरात घुसलेल्या चोरांनी ४० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला. मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात ही घटना घडली. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आरोपी महिलेच्या घरामध्ये घुसले होते त्यानंतर त्यांनी महिलेसोबत भयंकर कृत्य केले. त्यानंतर त्यांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाकूड टाकून तिला गंभीर जखमी केले. महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या इंदूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिस अधीक्षक रघुवंश कुमार सिंह यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, बोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री ५ ते ६ जण एका महिलेच्या घरात घुसले. यामधील दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिच्या प्रायव्हेट पार्टला इजा पोहचवली. महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक जखमा आढळून आल्या. महिलेची अवस्था खूपच गंभीर आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, 'महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक लाकडी वस्तू घालण्यात आली होती.' पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, घटनास्थळावरून काही पुरावे जप्त करण्यात आले आहेत पण तपास सुरू असल्याने त्याबद्दल अधिक तपशील देता येणार नाही. या घटनेदरम्यान आरोपीने महिलेच्या घरातून चांदीचे दागिने आणि एक मोबाईल फोन चोरला. आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने महिलेच्या घरात घुसले होते. सर्व बाबींचा तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा मृतदेह आढळला, बारामतीत खळबळ

Prajakta Mali : "ये अदा है हँसी..."; प्राजक्ता माळीनं पूर्ण लूकच बदलला, फोटो पाहून चाहते झाले दिवाने

ट्रेडिशनल आणि मॉडर्न, दोन्ही लूकवर उठून दिसतील असे 5 मंगळसूत्र

LPG Price Hike : सामान्यांच्या खिशाला पुन्हा झटका? LNG महागलं, आता LPG सिलिंडरचेही दर वाढण्याचे संकेत

Railway track ballast: ट्रेनच्या रुळांखाली खडीसारखे दगड का असतात? यामागचं कारण ऐकून व्हाल थक्क!

SCROLL FOR NEXT