Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : 5 विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला मारण्याचा कट रचला, 9 वर्षीय मुलीचा गेला बळी; सीसीटीव्हीमुळे आले सत्य समोर

Raipur News : शाळेतल्या शिक्षिकेचा राग आल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत स्फोट घडवून आणला. पण शिक्षिकेच्या जागी त्यात एका लहान मुलगी जखमी झाली. या प्रकरणात आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.

Yash Shirke

Crime : शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी ५ विद्यार्थांनी शाळेत स्फोट घडवून आणला. ही घटना छत्तीसगडच्या रायपूरमध्ये घडली आहे. शिक्षकेचा राग आल्याने तिला शाळेच्या बाथरुममध्ये स्फोटाने उडवण्याची योजना विद्यार्थांनी आखली होती. पण यात एका नऊ वर्षांच्या मुलीचा बळी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे ५ विद्यार्थी एका शिक्षिकेवर नाराज होते आणि तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. स्फोट कसा करायचा याची माहिती आरोपींनी मिळवली. सोडियम पाण्याच्या संपर्कात आल्याने त्याची स्फोटक प्रतिक्रिया होते याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पाहिला. एका विद्यार्थिनीने तिच्या मावशीच्या नावाने सोडियम ऑनलाइन ऑर्डर केले. बाथरुममध्ये ते अशा प्रकारे लपवले की ज्याक्षणी कोणी फ्लश करेल तेव्हा तेथे स्फोट होईल.

त्याचदरम्यान एक नऊ वर्षांची मुलगी बाथरुममध्ये गेली. तिने फ्लश केले, त्याच क्षणी स्फोट झाला. स्फोटाचा आवाज आणि लहान मुलीच्या किंचाळ्या ऐकून शाळेतील कर्मचारी मदतीसाठी धावले. बाथरुमचा दरवाजा तोडल्यावर नऊ वर्षांची मुलगी बाथरुममध्ये खाली पडल्याचे त्यांना दिसले. तिचे संपूर्ण शरीर भाजले होते. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी स्फोट करणाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे.

एका नऊ वर्षाच्या मुलीला त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केला याचा तपास पोलीस करत होते. या स्फोट प्रकरणामुळे ते हैराण झाले होते. शेवटी त्यांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. फुटेजमध्ये काही विद्यार्थ्यांनी बाथरुममध्ये सोडियम लावल्याचे स्पष्ट दिसले. या कटामध्ये शाळेतील आठवी-नववी इयत्तेमधील दोन मुलं आणि तीन मुली सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींना पोलिसांनी बालसुधारगृहात पाठवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

Jio चे दमदार रिचार्ज प्लान्स! एका रिचार्जमध्ये 10 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन एकदम FREE, तुम्ही पाहिलेत का?

Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? अजित आगरकर पहिल्यांदाच इतका स्पष्ट बोलला

Saturday Horoscope : धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ कार्य हातून घडणार; ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ

SCROLL FOR NEXT