Navi Mumbai saam tv
क्राईम

Shocking : पत्नीला मारलं, नंतर पोलिसांना गुंगारा दिला, पण चिमुकलीनं आरोपी बापाचं पितळ उघडं पाडलं, प्रकरण काय?

Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये पतीने विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीला हातपाय बांधून जाळून हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर पतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सात वर्षीय मुलीच्या साक्षीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • नवी मुंबईत उरण परिसरात पतीकडून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

  • पतीने विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीला जाळून ठार केले.

  • आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ७ वर्षीय मुलीच्या साक्षीने सत्य समोर आले.

  • आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे.

नवी मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील उरण परिसरातील पागोटेगाव येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने विवाहबाह्य संबंधातून पत्नीला जाळून मारल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे पत्नी मृत पावल्यानंतर पतीने तिची आत्महत्या झाली असल्याचं सांगून दिशा भूल करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या ७ वर्षीय मुलीने बाबांनीच आईला मारलं असल्याचं पोलीस चौकशीत सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील उरण परिसरातील पागोटेगाव येथे राहणाऱ्या राहुल (बदललेले नाव ) याने आपल्या पत्नीचे बाहेर दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. या संशयातून त्या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. २५ ऑगस्ट रोजी पाहटे राहुल आणि त्याच्या पत्नीमध्ये टोकाचा वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या राहुलने पत्नीचे हात पाय बांधून तिच्यावर रॉकेल ओतले आणि लाईटरने तिला जाळून टाकले.

या घटनेनंतर आपण काहीच केले नसून ही एक आत्महत्या असल्याचं चित्र त्याने उभारलं. कथित कहाणी रचून राहुलने पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलीस तपासात त्याच पितळ उघड पडलं असून राहुलच्या सात वर्षीय मुलीने वडिलांनीच आईला मारल्याचं सांगितलं.

उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हनीफ मुलानी यांनी सांगितल्यानुसार, आरोला त्याच्या पत्नीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्याने पीडितेचे हात आणि पाय बांधले, तिच्यावर रॉकेल ओतले आणि उरण येथील त्यांच्या घरी लाईटरने तिला जाळून टाकले, असे त्यांनी सांगितले. दरम्यान राहुल याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

SCROLL FOR NEXT