Rajsthan News Saam Tv
क्राईम

Shocking News : आईने दोन पेग घेतले त्यानंतर..., हत्या करून निळ्या ड्रममध्ये मृतदेह लपवला, चिमुकल्यानं सांगितलं वडिलांसोबत काय घडलं?

Rajsthan News : राजस्थानातील अलवर जिल्ह्यात पत्नीने प्रियकराच्या साथीने नशेत पतीची हत्या करून मृतदेह छतावरील ड्रममध्ये लपवला. या घटनेनंतर पोटच्या मुलाने ही घटना उघडकीस आणली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • अलवर जिल्ह्यातील खैरथल-तिजारा परिसरातील घराच्या छतावर ड्रममध्ये सापडला मृतदेह

  • पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीची हत्या केल्याचे उघड

  • ८ वर्षीय मुलाने पोलिसांसमोर केला धक्कादायक खुलासा

  • पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला अटक करून पुढील तपास सुरू केला

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात नुकतीच एक थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. खैरथल-तिजारा तालुक्यातील एका घराच्या छतावर ठेवलेल्या निळ्या प्लास्टिकच्या ड्रममधून एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे नाव हंसराम असून त्याची हत्या करण्यात आली आहे. धक्कदायक म्हणजे ही हत्या त्याचीच पत्नी सुनीता आणि तिचा कथित प्रियकर जितेंद्र यांनी केली असल्याचं त्याच्या ८ वर्षीय मुलाने उघडकीस आणलं आहे.

हंसराम उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील रहिवासी होता. हंसराम गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या पत्नी सुनीता आणि तीन मुलांसह किशनगड बास परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहत होता. तो स्थानिक वीटभट्टीवर मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारी शेजाऱ्यांना घराच्या छतावरून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. शंका आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपासणी दरम्यान छतावर ठेवलेल्या एका मोठ्या ड्रमची पाहणी केली असता, आत हंसरामचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोल जखम झालेली होती. तसेच मृतदेहावर मीठ टाकलेले दिसले, ज्यामुळे शरीर लवकर कुजावे आणि दुर्गंधी दाबली जावी असा संशय व्यक्त करण्यात आला.

पोलिसांनी चौकशी केल्यावर, हंसरामच्या आठ वर्षांच्या मुलाने या हत्येबाबत सविस्तर माहिती दिली. त्याने सांगितले की घटनेच्या रात्री त्याचे आई-वडील आणि जितेंद्र नावाचा व्यक्ती घरात एकत्र दारू पित होते. दारूच्या नशेत हंसरामने पत्नी सुनीताला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाद विकोपाला गेला. त्यात जितेंद्रने हस्तक्षेप करत हंसरामला आडवे येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुनीताने आपल्या तीनही मुलांना झोपायला पाठवले.

हंसरामच्या मुलाच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्री तो अचानक जागा झाला असता त्याने आपल्या वडिलांना बेडवर निश्चल अवस्थेत पाहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पाहिले की आई आणि जितेंद्र मिळून वडिलांचा मृतदेह जवळ ठेवून उभे होते. त्यावेळी त्यांनी घरातील पाण्याने भरलेला मोठा ड्रम रिकामा केला, मृतदेह आत ठेवला, त्यावर मीठ टाकले आणि तो ड्रम छतावर नेऊन ठेवला.

हंसरामच्या मुलाने जितेंद्रबद्दलही माहिती दिली. तो वारंवार त्यांच्या घरी यायचा, मुलांसाठी मिठाई आणायचा आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करायचा. मात्र जितेंद्रच्या सततच्या येण्या-जाण्यामुळे हंसरामच्या मनात संशय निर्माण झाला आणि त्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडणं अधिक वाढली. या वादातून हंसरामच्या हत्या झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या प्रकरणी पोलिसांनी हंसरामची पत्नी सुनीता आणि तिचा कथित प्रियकर जितेंद्र या दोघांना अटक केली आहे. घटना उघड झाल्यानंतर ते दोघेही तिन्ही मुलांसह दुसऱ्या एका वीटभट्टीवर लपून बसले होते. तेथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणामुळे संपूर्ण राजस्थानात खळबळ उडाली असून समाजात कौटुंबिक तणाव, घरगुती हिंसा आणि व्यभिचारातून उभे राहणारे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारूच्या नशेत बायकोवर कुऱ्हाडीने वार, नंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; जळगाव हादरले

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट

Maharashtra Rain Live News: मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

Mumbai Monorail: मुंबईची मोनोरेल का बंद पडली? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

तलाठी नवऱ्याचं अनैतिक संबंध, पॅरालिसिस झालेली बायको नकोशी; अमानुष मारहाण करत...

SCROLL FOR NEXT