Pakistan Crime News  foods
क्राईम

Crime News: प्रेयसीच्या बर्गरवर मित्राने मारला डल्ला; संतापलेल्या प्रियकराने जीवच घेतला

Crime News: प्रेयसीचा बर्गर खाल्ल्याने संतापलेल्या प्रियकराने मित्राचा जीव घेतल्याची घटना पाकिस्तानातील कराचीत घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी एसएसपीच्या मुलाला अटक केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pakistan Crime News : फास्ट फूडमधील बर्गर हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा पदार्थ. समोर बर्गर बघताचबरोबर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत असतं. बर्गर खाण्याची हीच लालसा एका युवकाला महागात पडलीय. एका मुलाने बर्गरचा एक घास खाल्ला म्हणून त्याच्या मित्राने त्याचा जीव घेतल्याची घटना पाकिस्तानात घडलीय. नेमकी काय आहे ही घटना जाणून घेऊ..

बर्गरसाठी मित्राचा घेतला जीव

एका मुलाने त्याच्यासाठी आणि त्याच्या प्रेयसीसाठी दोन बर्गर मागवले. त्यांच्यासोबत असलेल्या मित्राने मुलीला दिलेल्या बर्गरचा एक घास खाल्ला. मित्राने प्रेयसीला दिलेला बर्गर खाल्ल्याने प्रियकर संतापला. रागाच्या भरात त्याने आपल्या मित्रावर रायफलमधून गोळ्या झाडल्या. ही घटना पाकिस्तानमधील कराचीत घडलीय.

या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, या हत्येचा तपास ८ फेब्रुवारीला पूर्ण झालाय. ही घटना कराचीमधील डिफेन्स फेज ५ भागात घडली होती. ज्या मुलाची हत्या झाली त्याची ओळख पटली असून तो सत्र न्यायाधीशांचा मुलगा आहे. त्याचं नाव अली किरियो आहे. तर आरोपी मुलाचं नाव दानियाल नजीर असं आहे. दानियाल हा एसएसपी नजीर अहमद मीरबहार याचा मुलगा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दानियालने ८ फेब्रुवारी रोजी आपली प्रेयसी शाजियाला आपल्या घरी बोलवलं होतं. त्यावेळी त्याचा मित्र अली कीरियो आणि त्याचा भाऊ अहमरही तेथे उपस्थित होता. हत्येतील आरोपी प्रियकराने त्याच्यासाठी आणि प्रेयसी शाजियासाठी दोन बर्गर मागवले. त्यावेळी कीरियोने दानियालच्या प्रेयसीकडे असलेल्या बर्गरचा एक घास खाल्ला.

यामुळे दानियाल संतापला. त्यानंतर दानियाल आणि कीरियो यांच्यात भांडण सुरू झालं. संतापलेल्या दानियालने गार्डककडे असलेल्या रायफलमधून कीरियोवर गोळ्या झाडल्या. यात कीरियो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केलाय. वृत्तानुसार या हत्येसाठी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला जबाबदार धरण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी दानियाल नजीर याला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांची तब्बेत बिघडली, वृंदावनमधील पदयात्रा रद्द

Govinda : गोविंदाच्या इव्हेंटमध्ये राडा! बाउन्सरने धक्काबुक्की केल्याने वाद चिघळला, VIDEO व्हायरल

Chole Bharture Recipe: स्ट्रीट स्टाईल चमचमीत छोले भटुरे बनवायचेत; फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप रेसिपी

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT