Wardha Crime  Saam Tv
क्राईम

Crime News: शेतीसाठी सख्खा भाव पक्का वैरी झाला, तलवारीने सपासप वार करत धाकट्याने थोरल्याचा जीव घेतला

Wardha Crime: वर्ध्यामध्ये सख्ख्या भावांमध्ये शेतीवरून वाद झाला. या वादात धाकट्याने थोरल्याचा जीव घेतला. तलवारीने सपासप वार करत शेतातच संपवलं. या घटनेमुळे वर्ध्यात खळबळ उडाली.

Priya More

चेतन व्यास, वर्धा

शेताच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धामध्ये घडली. दिघी शिवारात ही घटना घडली. याठिकाणी तलवारीने सपासप वार करत भावाला जागीच संपवण्यात आलं. याप्रकरणी देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

शेताचा वाद इतका विकोपाला गेला की भावबंदकीच रक्तबंबाळ झाली. लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या भावावर तलवारीने सपासप वार करत शेतातच संपवलं. ही घटना देवळीपासून ३ किलोमीटर अंतरावरील दिघी शिवारातील एखा शेतात मंगळवारी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी घाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. शंकर नानाजी येळणे (६९ वर्षे) असे मृताचे नाव आहे. तर बाबा नानाजी येळणे (६० वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बाबा येळणे आणि मृतक शंकर येळणे दोघांचेही शेत आजूबाजूला आहे. घटना घडण्यापूर्वी या दोघांमध्ये शेताच्या धुऱ्यावर वाद झाला. काही दिवसांआधी आरोपी आणि मृतक या दोघांचा लहान भाऊ साहेबराव येळणे याच्या शेतीचे साहित्य चोरीला गेले होते. या साहित्यात डवरे, तिफन, नांगर, पलंग, टेबल, तसेच ओलताच्या दहा पाइपचा समावेश होता. या चोरीची शहानिशा करीत असतांना साहेबराव येळणे याला बाबा येळणे याच्यावर संशय होता. त्यामुळे साहेबरावने मोठा भाऊ शंकर येळणे यांच्यासोबत जाऊन देवळी पोलिसात तक्रार दिली होती.

ही तक्रार मृतक शंकर येळणे याच्या सांगण्यावरून करण्यात असल्याचा बाबा येळणेला संशय होता. त्यामुळे त्याचा शंकर येळणे या मोठ्या भावावर राग होता. शंकर येळणेचा बदला घेण्याबाबत तो आधी बोललाही होता. त्यामुळे हा वचपा काढण्यासाठीच त्याने भावाची हत्या केल्याचे बोलले जात आहे. आरोपीने मोठ्या भावाची तलवारीने सपासप वार करत शेतातच हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. तर मृतक शंकर येळणे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. पुढील तपास देवळी पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात गोल्फ क्लब उड्डाण पुलावर दहा गाड्या एकमेकांना धडकल्या

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT