Delhi Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : दिल्लीतील हॉटेलमध्ये ब्रिटिश महिलेवर सामूहिक बलात्कार, त्याच्यासाठी इंडियात आली अन् भयंकर घडलं

Delhi Crime : इन्स्टाग्रावर दिल्लीमधील रील्स स्टारसोबत ओळख झाली. ब्रिटिशमधील महिला भारतात आल्यानंतर त्याला भेटायला गेली. पण हॉटेलमध्ये तिच्यासोबत भयंकर घडलं. पोलिसांनी तात्काळ दोन जणांना बेड्या ठोकल्या असून तपास सुरू आहे.

Yash Shirke

Delhi Crime News : ब्रिटिश महिलेवर दिल्लीमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर ब्रिटिश महिला त्याला भेटण्यासाठी भारतात आली होती. पण त्याच तरूणाने महिपालपूरमधील हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. एएनआय न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे.

ब्रिटिश महिलेनं तिच्यासोबत भयंकर कृत्य घडल्यानंतर मित्राची दिल्ली पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन जणांना बेड्या ठोकल्या. ब्रिटिश महिला आणि आरोपीचा इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. आरोपी इन्स्टाग्रामवर रील्स करायचा. ब्रिटिश महिला आणि आरोपी यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती. ब्रिटिश महिलेसोबत मित्राने बलात्कार केला, त्याच्यासोबत मित्रही होता. दोघांनी आळी पाळीने तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव कैलाश असल्याचे समोर आले आहे.

आरोपीला इन्स्टाग्राम रील्स करण्याचे वेड -

ब्रिटिश महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संशयीत असणाऱ्या दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्याशिवाय ब्रिटिश दूतावासात या घटनेची माहिती देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दिल्लीमधील महिपालपूर येथील एका हॉटेलमध्ये ब्रिटिश महिलेसोबत बलात्कार केल्याप्रकरणी २ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. छेडछाड आणि बलात्काराच्या आरोपाखाली त्याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी काय सांगितले ?

राजधानी दिल्लीमधील वसुंधरा मयूर विहारी येथील कैलाश याला इन्स्टाग्रावर रील्स तयार करण्याचे वेड आहे. काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावर लंडन येथील महिलेसोबत त्याची ओळख झाली. ब्रिटिश महिला महाराष्ट्र आणि गोव्याला फिरण्यासाठी भारतात आली होती. त्यावेळी महिलेने कैलाशला भेटण्यासाठी गोव्यात बोलवले. पण कैलाशने वेळ नसल्याचे सांगत टाळले अन् तिलाच दिल्लीमध्ये बोलवले. दिल्लीमधील महिपालपूर येथील हॉटेलमध्ये ब्रिटिश महिलेनेच रूम बूक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT