Indore Crime News Saam Digital
क्राईम

Crime News : पोटच्या मुलानंच वडील अन् बहिणीला संपवलं; ४८ तास मृतदेहांजवळ होता बसून, दुहेरी हत्याकांडामागचं कारण चक्रावणारं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Indore Crime News

मध्य प्रदेशातील इंदूरमधील दुहेरी हत्याकांडाचा अखेर छडा लागला आहे. पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांची आणि सख्ख्या बहिणीची हत्या केल्याचे तपासात समोर आले. धक्कादायक म्हणजे दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी त्यांच्या मृतदेहांजवळ ४८ तास बसून राहिला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वडील आणि बहिणीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गोव्यातून त्याला अटक करण्यात आली. नवलखाच्या वसुधैव कुटुंबकम अपार्टमेंटमध्ये ८ नोव्हेंबरला किशोर धामन्दे आणि रमा अरोरा यांचे मृतदेह आढळले होते. .('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा पुलकित हा फरार होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. बँक ट्रान्झॅक्शनच्या आधारे पोलिसांनी आरोपीला गोव्यातून अटक केली.

लग्न न करून दिल्यानं नाराजी

४६ वर्षीय आरोपी अविवाहित होता. लग्न करून न दिल्यानं तो वडिलांवर नाराज होता. काही दिवसांपूर्वी त्याला नशामुक्ती केंद्रातून घरी आणले होते. मनोरुग्ण असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. हत्या केल्यानंतर तो ४८ तास दोघांच्या मृतदेहांजवळ बसून होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

औषधे घेण्यास सांगितली म्हणून होता राग

हत्येच्या दिवशी पुलकितला त्याच्या बहिणीने आणि वडिलांनी त्याची औषधे घेण्यास सांगितले. त्यावर तो अचानक चिडला आणि त्याने घरात असलेल्या मुसळीने दोघांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली.

बँक ट्रान्झॅक्शनमुळं आरोपी अलगद अडकला

या दुहेरी हत्याकांडानतंर आरोपी फरार झाला होता. इंदूर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपीला पकडून देणाऱ्यांना १०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. काही दिवसांनी बँक ट्रान्झॅक्शनवरून आरोपीचा माग काढला. अखेर गोव्यातून त्याला अटक करण्यात आली.

हत्येनंतर पश्चाताप नाही

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. त्यानं दिलेली माहिती सुन्न करणारी आहे. बहीण माझ्याविषयी कायमच वडिलांना भडकवत असे. तसंच वडिलही मला प्रत्येक गोष्टीवरून अडवणूक करायचे, असं त्यानं सांगितलं. वडिलांची अन् बहिणाची हत्या केल्यानंतर आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही दिसत नव्हता, असं पोलिसांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT