Crime News Saam TV
क्राईम

Cyber Crime : CBI अधिकारी बोलतोय..., गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली, आजोंबांना १ कोटींचा गंडा

Luknow News : लखनऊमध्ये तब्बल १०० वर्षीय वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून त्याच्या मुलाकडून १.२९ कोटी रुपये उकळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर गुन्हेगारांच्या नव्या पद्धतीमुळे देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे.

Alisha Khedekar

  1. लखनऊमध्ये १०० वर्षीय वृद्ध व्यक्ती डिजिटल अरेस्ट करून फसवले गेले.

  2. निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याकडून १.२९ कोटी रुपये उकळले गेले.

  3. गुन्हेगारांनी गुजरात, गोवा आणि जळगावमधील बँक खाती वापरली.

  4. पोलिस तपास सुरू असून, सायबर सुरक्षेबाबत जागरूकतेची गरज अधोरेखित झाली.

लखनऊमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. तब्बल १०० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून त्याच्या मुलाकडून तब्बल १ कोटी २९ लाख रुपये उकळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वृद्ध व्यक्तीचा मुलगा हा निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकारी असून सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सापडला.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमधील ही घटना गेल्या आठवड्यात घडली आहे. सायबर गुन्हेगारांनी स्वतःला CBI अधिकारी म्हणून दाखवत आणि वृद्ध व्यक्तीवर एका कथित प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचे खोटे सांगितले. व्हिडिओ कॉल व फोन कॉलच्या माध्यमातून त्यांनी या वृद्धाला सहा दिवस "डिजिटल अरेस्ट" करून ठेवले.

वडिलांसोबत घडणाऱ्या या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलाने, म्हणजेच निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने, तात्काळ गुन्हेगारांच्या सांगण्यावरून गुजरात, गोवा आणि जळगाव येथील विविध बँक खात्यांमध्ये तब्बल १.२९ कोटी रुपये ट्रान्सफर केले. ठरलेली रक्कम भरल्यानंतर देखील गुन्हेगारांनी कोणताही संपर्क साधला नाही आणि पैसे परत करण्याचे आश्वासनही पूर्ण केले नाही.

जेव्हा मुलाला याचा संशय आला तेव्हा त्याने तात्काळ लखनऊ पोलिसांशी संपर्क साधला आणि अधिकृत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास सुरू केला असून, हे मोठ्या सायबर रॅकेटचे काम असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असे उघड झाले आहे की, या सायबर टोळीने गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रातील बँक खाती वापरून व्यवहार केले होते.

या प्रकरणाने सायबर सुरक्षा आणि डिजिटल फसवणूक या विषयांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वृद्ध व्यक्तींचे डिजिटल साक्षरतेचे अभाव, कायद्याविषयी भीती आणि गुन्हेगारांचे तांत्रिक कौशल्य यामुळे अशा घटना घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. "डिजिटल अरेस्ट" ही संकल्पना भारतात नवी असली तरी आता गुन्हेगार ती वापरून लोकांना मानसिकदृष्ट्या कैद करून पैसे उकळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

SCROLL FOR NEXT