Nigeria Bomb Blast Google
क्राईम

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Crime News Bomb Blast At Worship Place: प्रार्थनास्थळातील स्फोटामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर नायरेजियामध्ये घडली आहे. या स्फोटात १६ जण जखमी झाले आहेत.

Rohini Gudaghe

प्रार्थनास्थळातील स्फोटामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर नायरेजियामध्ये घडली आहे. या स्फोटात १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी आठ लोकांचा मृत्यू झालाय. त्तर नायजेरियामधील कानो राज्यात एका स्थानिक व्यक्तीने बनवलेल्या स्फोटकांनी प्रार्थनास्थळावर हल्ला केला. त्यामुळे भीषण स्फोट होवून आगीत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १६ जण जखमी झाले आहेत.

पोलीस प्रवक्ते अब्दुल्लाही हारुना यांनी दिलेल्या एका निवेदनात सांगितलंय की, ३८ वर्षीय स्थानिक रहिवासी असलेल्या संशयिताने कानोच्या दुर्गम गदान गावातील प्रार्थनास्थळावर हल्ला (Nigeria Bomb Blast) केल्याचे कबूल केलं आहे. उत्तर नायजेरियातील कानो येथे या हल्ल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. १६ मे रोजी स्थानिक टेलिव्हिजन चॅनल दिलेल्या माहितीनुसार स्फोटात जखमी झालेल्यांपैकी आठ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींमध्ये चार लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती टीव्ही नाईन हिंदीच्या हवाल्यानुसार मिळत (Crime News) आहे.

स्थानिक पोलीस प्रमुख ओमर सांडा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार की, संशयिताने स्थानिकरित्या बनवलेल्या बॉम्बने प्रार्थनास्थळावर हल्ला केला. त्यामुळे भीषम स्फोट झाला आहे. याचा दहशतवादाशी काहीही (Bomb Blast At Worship Place) संबंध नाही. स्थानिक टेलिव्हिजन चॅनलने प्रसारित केलेल्या फुटेजमध्ये कानो राज्यातील गदान गावातील मुख्य प्रार्थनास्थळाच्या जळलेल्या भिंती आणि जळालेले फर्निचर दिसत आहे.

पोलिसांनी निवेदनात दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे प्रॉपर्टीवरून काही लोकांसोबत मतभेद झाले होते. ते लोकं प्रार्थनास्थळात आले होते. त्यामुळे आरोपीने त्यांच्यावर हल्ला (Property Dispute) केला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ सील केले आहे, तर जखमींच्या राज्याच्या राजधानीतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर प्रार्थनास्थळाचे दरवाजे कुलुपबंद असल्यामुळे आतील लोकांना बाहेर पडता आलं नसल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT