Amravati News Saam Tv
क्राईम

Crime News : प्रमोशन देतो म्हणत नर्ससोबत नको ते केलं, आयुर्वेदिक कॉलेजच्या प्राचार्याचा प्रताप, डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Amravati News : अमरावतीतील कठोरा परिसरातील पोटे आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्यामसुंदर भुतडा यांनी नर्सला बढतीचे आमिष देत लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.

Alisha Khedekar

  • अमरावतीत प्राचार्यावर नर्सवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप

  • बढतीच्या आमिषाने प्राचार्याचे घृणास्पद कृत्य, गुन्हा दाखल

  • फॉरेन्सिक तपासणीदरम्यान आरोपी प्राचार्य फरार असल्याचे स्पष्ट

  • शहरात संतापाचे वातावरण, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

अमरावतीमधून धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. कठोरा परिसरातील पोटे आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्यामसुंदर भुतडा यांनी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या नर्सला बढती देण्याचे आश्वासन देत तिच्यावर जबरदस्ती केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्राचार्य डॉ. श्यामसुंदर भुतडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भुतडा यांनी आपल्या महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका नर्सला मेट्रन पदावर बढती देण्याचे आश्वासन देत त्यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. एवढ्यावरच न थांबता, डॉ. भुतडा यांनी त्या महिलेवर अमानुष मागणी लादली. त्यांनी त्या महिलेला थेट तिच्या तरुण मुलीला शरीरसुखासाठी आपल्या जवळ पाठविण्याचा अघोरी प्रस्ताव ठेवला. या मागणीला पीडित महिलेने ठाम नकार दिल्यावर, तिच्यावर सूड उगविण्याच्या हेतूने तिला नोकरीवरून काढण्यात आले.

या घटनेनंतर संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्राचार्य शामसुंदर भुतडा यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. भुतडा यांच्या निवासस्थानाची फॉरेन्सिक तपासणीदेखील करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी ठोस पुरावे जमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर प्राचार्य श्यामसुंदर भुतडा हे फरार झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक दहातोंडे यांनी दिली.

सध्या पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत असून, आरोपी प्राचार्य श्यामसुंदर भुतडा यांचा शोध घेण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा गंभीर घटनांबाबत संस्थेने यापूर्वी कोणती भूमिका घेतली, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी काय पावले उचलली जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जगातील पहिल्या रेल्वे प्रवासाची सुरुवात कोणत्या देशात झाली? जाणून घ्या

Kolhapur Crime News : दूध आणायला गेलेल्या बहिण भावाचं अपहरण, रणरागिणीने अपहरणकर्त्यांचा डाव उधळला

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला, जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक, नेमकं काय घडलं?

Crime News : भजन ऐकायला निघाली, वाटेत अडवलं अन् मूकबधिर मुलीवर सामूहिक बलात्कार

Maharashtra Live News Update: वकील गुणरत्न सदावर्ते धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी जालन्यात दाखल

SCROLL FOR NEXT