पोटच्या मुलीवर बापाने केला बलात्कार  Saam Tv
क्राईम

Crime News : नात्याला काळिमा! आधी बापाने, मग मामानेही केला अत्याचार, १० वर्षांच्या मुलीसोबत भयंकर कृत्य!

Akola Crime News : अकोल्यात जन्मदात्या बापानेच 10 वर्षांच्या पोटच्या गोळ्यासोबत लैंगिक अत्याचार केलाय. त्रास सहन न झाल्यानं मुलीनं अखेर बाल न्यायालयासमोर वडिलांची तक्रार केली.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

Akola Crime News : अकोला : गेल्या काही दिवसांपासून महिला, तरुणींसोबत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दररोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. पण अकोल्यात घडलेल्या घटनेमुळे तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. होय.. अकोल्यात १० वर्षीय मुलीसोबत आधी बापाने त्यानंतर मामानेही अत्याचार केला. पोलिसांनी दोघांनाही तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. पण या घटनेमुळे अकोलाच नाही तर राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. बापाने आणि मामाने नात्याला काळिमा फासल्यामुळे अकोल्यात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

अकोल्यात जन्मदात्या बापानेच 10 वर्षांच्या पोटच्या गोळ्यासोबत लैंगिक अत्याचार केलाय. त्रास सहन न झाल्यानं मुलीनं अखेर बाल न्यायालयासमोर वडिलांची तक्रार केली. दरम्यान 24 ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातल्या हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला होता. तिच्याच दूरच्या नातेवाईकानं हा अत्याचार केला होता. मुलीला नातेवाईकांकडे ठेवून आई वडील बाहेर गेलेय.. याच संधीचा फायदा घेत पीडित मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश गवई याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केलाय.

या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अकोट फैल पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली.. बाल न्याय मांडळासमोर पीडित मुलीचे जबाब नोंदवत असताना तिने वडिलांकडून होणाऱ्या अत्याचाराबाबत माहिती दिली.. आपण दुसऱ्या वर्गात असल्यापासून वडील अत्याचार करत असल्याची माहिती मुलीने दिली.. तिच्या या तक्रारनंतर वडिलांवर देखील अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तसेच लागलीच त्यांना अटक ही झाली आहे.. सद्यस्थितीत अत्याचार करणारे दूरचा नातेवाईक आणि वडील अटकेत आहे. दरम्यान, अत्याचार करणाऱ्या वडील आणि मामावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरवठा करणार असल्याची माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT