Chienes Couple X Twitter
क्राईम

Crime News: लग्नासाठी जोडप्यानं २ लहान मुलांना १५ व्या मजल्यावरून फेकलं; न्यायालयानं दिली मृत्यूदंडाची शिक्षा

Bharat Jadhav

Chienes Couple Killed 2 Child For Marriage :

लग्नात अडथळा ठरणाऱ्या आपल्या दोन मुलांना एक व्यक्तीने आपल्या दोन मुलांना इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून खाली फेकून दिले होते. ही घटना २०२० मध्ये चीनमधील चोंगकिंगमध्ये घडली होती. याप्रकरणी निकाल देताना सुप्रीम पीपल्स कोर्टाने एका जोडप्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावलीय. झांग बो असं तरुणाचे नाव आहे तर तरुणीचे नाव ये चेंगचेन असं आहे. या दोघांना न्यायालयाने मृत्यूची शिक्षा सुनावलीय. (Latest News)

या जोडप्याने कट रचून दोन्ही लहान मुलांना १५ मजल्यावरून खाली फेकल्याची कबुली त्यांनी न्यायालयात दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावलीय. याविषयीचे वृत्त चायना डेली या वृत्तसंस्थेने दिले आहे. या जोडप्याला लग्न करायचे होते. परंतु त्यात झांगचे दोन लहान मुले अडथळा ठरत होते. त्यामुळे झांग आणि त्याच्या प्रेयसीने या मुलांचा खून करण्याचा विचार केला. मुलांची हत्या केल्यानंतर त्यांनी त्याला अपघात बनवण्याचा प्रयत्न केला. या दोघांचा हेतू घृणास्पद आणि क्रूर होता. कायद्यानुसार या जोडप्याला कठोर शिक्षा करणे आवश्यक असल्याचं कोर्टाने सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान १५ मजल्यावरून फेकलेल्या मुलांमध्ये एक मुलाची समावेश आहे. मुलीचे वय २ वर्ष होते तर मुलाचे वय १ वर्ष होते. झांगचे येसोबत विवाहबाह्य संबंध सुरू होते. झांगला दोन मुले होते. झांगने त्याची प्रेयसी ये ला याची कल्पना दिली नव्हती. झांगने आपली पत्नी मीलीनला घटस्फोट दिल्यानंतर ये ने झांगला त्याचा मुलांची हत्या करण्याचे सांगितले.

हे मुलं लग्न करण्यासाठी हे अडकाठी ठरत असल्याचं सांगितलं. प्रेयसीचं ऐकून झांगने २०२० मध्ये आपली मुलगी झांग रुई क्यूई आणि मुलगा झांग यांग रुई यांची हत्या केली. २८ डिसेंबर २०२१ रोजी चोंगकिंग क्रमांक ५ इंटरमीडिएट पीपल्स कोर्टाने आपल्या मूळ निकालात फाशीची शिक्षा ठोठावली.

दोन्ही प्रतिवादींनी पहिल्या खटल्यानंतर निकालाला आव्हान दिलं. ६ एप्रिल २०२३ रोजी झांग आणि ये यांच्यासाठी दुसरा खटला चोंगकिंग उच्च लोक न्यायालयात झाला. ११ मे २०२३ रोजी चोंगकिंग हाय पीपल्स कोर्टाने मूळ निकाल कायम ठेवला आणि झांग आणि ये यांना दिलेली शिक्षा योग्य असल्याचे म्हटलं. न्यायालयाने त्यांचा निर्णय सुप्रीम पीपल्स कोर्टात मंजुरीसाठी सादर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

Viral Video: लोकलच्या गर्दीत अंताक्षरीचा खेळ! टाळ, तबल्यासोबत जोरदार मैफिल रंगली; सुंदर VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT