Bhiwandi Crime News Saam Digital
क्राईम

Gadchiroli Crime: मुलांनीच केला जन्मदात्यांचा घात, जादूटोण्याच्या संशयातून केली आई-वडील आणि भाचीची हत्या, परिसरात खळबळ

Gadchiroli Crime News In Marathi: गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरी गावात ६ डिसेंबर रोजी झालेल्या वृद्ध दाम्पत्य आणि एका दहा वर्षीय बालिकेच्या हत्येचा उलगडा झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मंगेश भांडेकर, गडचिरोली

Gadchiroli Crime News :

गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरी गावात ६ डिसेंबर रोजी झालेल्या वृद्ध दाम्पत्य आणि एका दहा वर्षीय बालिकेच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे. दोन मुलं आणि पाच नातेवाईकांनी मिळून जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध आई-वडील आणि भाचीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. (Latest Marathi News)

दोन मुलं आणि पाच नातेवाईकांनी मिळून जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध आई-वडील आणि भाचीची हत्या केल्याचे उघड झालं आहे. मुलगा रमेश कुमोटी, दुसरा मुलगा विनु कुमोटी तसेच त्याचे नातेवाईक जोगा कुमोटी, गुना कुमोटी, राजू आत्राम, नागेश उर्फ गोलु येमला, सुधा येमला, कन्ना हिचामी तसेच मृतकाचा जावई तानाजी कंगाली असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय घडलं?

6 डिसेंबरला रात्री 60 वर्षीय देऊ कुमोटी आणि त्यांच्या पत्नी बीचे देऊ कुमोटी यांच्यासह 10 वर्षीय नात अर्चना तलांडी यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली होती. या संदर्भात मृतकाचा मुलगा विनु देवु कुमोटी यांच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन आलदंडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा तपास करताना तक्रार करणाऱ्यावर संशय आल्याने पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली.

देवु कुमोटी हा या परिसरातील मोठा पुजारी आहे. तो जादूटोणा करुन अनेक लोकांना आजारी पाडून पुढे त्यांचा मृत्यु होतो, असा संशय गुंडापुरीतील आणि त्या परिसरालगत असलेल्या काही गावांमध्ये होता.

पोलिसांच्या तपासात काय उघड झालं?

पोलिसांच्या तपासात परिसरात जे व्यक्ती मृत्युमुखी पडले, ते कॅन्सर व अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त असताना देखील त्यांचे नातेवाईक त्यांना वैदयकीय उपचार न देता वेगवेगळ्या पुजाऱ्यांकडे न्यायचे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत जास्त बिघाड होऊन ते मृत्युमुखी पडले, असे समोर आले.

या मृतकांच्या नातेवाईकांना मृतक देवु कुमोटी हा जादूटोणा करीत असल्याची धारणा असल्याने त्याच्याबद्दल प्रचंड रोष होता.

लोकांच्या आजारपणास देवु कुमोटी हाच कारणीभूत असल्याचे मानून मृतकाचे दोन मुले आणि नातेवाईक यांनी कट रचून मृतक देवु कुमोटी याच्या डोक्यावर हातोडीने जोरदार प्रहार करुन आणि मृतकाची पत्नी बिच्चे कुमोटीचीही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT