Chhatrapati Sambhajinagar News:  Saamtv
क्राईम

Crime News: खळबळजनक! दरोडेखोरांच्या हल्ल्यात 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'च्या तालुका अध्यक्षांचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar News: दरोडेखोरांनी आसपासच्या घरांना बाहेरून कड्या लावून राजू हार्दे यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर घटनेने संभाजीनगर जिल्हा हादरला असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Gangappa Pujari

रामनाथ ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. १९ सप्टेंबर

Chhatrapati Sambhajinagar Crime: दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे ही धक्कादायक घटना घडली. दरोडेखोरांनी आसपासच्या घरांना बाहेरून कड्या लावून राजू हार्दे यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर घटनेने संभाजीनगर जिल्हा हादरला असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. राजू आसाराम हरदे असे त्यांचे नाव असून खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बुधवार (ता. १९ सप्टेंबर) रात्री २ वाजण्याच्या सुमारास ६ दरोडेखोरांनी राजू आसाराम हरदे यांच्या घरात प्रवेश केला. धक्कादायक बाब म्हणजे त्याआधी दरोडेखोरांनी आजूबाजूच्या ७ ते ८ घरांना बाहेरून कडी लावून घेतली. त्यानंतर दरोडेखोरांनी राजू हार्दे यांच्यावर धारदार शस्त्राने पोटात आणि डोक्यात वार केले. आसपासच्या घरांच्या दरवाजांना कड्या लावल्याने मदतीला कोणाला येता आले नाही.

त्यानंतर एक जण दरवाजाची कडी तोडून बाहेर आला. त्यावेळी दरोडेखोरांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राजू हारदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. याबाबत अधिक तपास सध्या सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT