Killed Security Guard Saam Tv
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar News: खळबळजनक! अज्ञात व्यक्तींनी केली सुरक्षा रक्षकाची हत्या, परिसरात भीतीचं वातावरण

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यक्तीचा काही अज्ञात लोकांनी एका सुरक्षा रक्षकाचा खून केलाय. ही घटना वाळूज परिसरात घडली आहे. डोक्यात दगड घालून सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे वाळूज परिसरात भीतीचं वातावरण आहे. वाळूज पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

नक्की काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात असणाऱ्या बजाज कंपणीच्या समोर एक चारचाकी गाड्यांचं गॅरेज आहे. त्या गॅरेजवर भाऊसाहेब नामदेव पडळकर हे सुरक्षारक्षकाचं काम करत (Chhatrapati Sambhajinagar News) होते. नेहमीप्रमाणे ते कार गॅरेजवर कामासाठी गेले होते. तेव्हा काही अज्ञात लोकांनी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली.

सुरक्षा रक्षकाची हत्या

वाळूज परिसरात (Waluj Area) एका गॅरेजवर काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाची काही अज्ञात आरोपींनी खून केल्याची घटना समोर (crime news) आलीय. भाऊसाहेब नामदेव पडळकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रात्रीच्या वेळी ते कामावर गेले असतांना मध्यरात्री आरोपींनी त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती पोलीसांनी दिली. मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय.

वाशिमधील धक्कादायक घटना

वाशिमच्या रिसोड तालुक्यात काही दिवसांपूर्वी लोणी बुद्रुक गावातील एका महिलेची हत्या झाली ( Killed Security Guard) होती. या महिलेचं नाव उषा विलास सुर्वे होतं. तर तिच्या पतीचा मृतदेह झाडाला गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यांचं नाव विलास सुर्वे असल्याचं समोर आलं होतं. या जोडप्याचा मृत्यू झाल्याने गावात मोठी खळबळ उडाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

Surat Tourism Place: नवरात्रीत बहरलं सुरत; मंत्रमुग्ध करणाऱ्या या ठिकाणांना आवश्य भेट द्या

Navaratri 2024 : मुंबईत 'या' देवीच्या मंदिरातील भिंत आहे खूप खास, सर्व इच्छा होतील पूर्ण

SCROLL FOR NEXT