Maharashtra Crime News:  Saamtv
क्राईम

Crime News: बेधुंद नशेत असणाऱ्या तरुणाने मित्राला संपवले, छत्रपती संभाजीनगरमधील भयंकर घटना; धक्कादायक कारण समोर

Maharashtra Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरातील विश्रांतीनगर भागात जुन्या वादातून बेधुंद नशेत असणाऱ्या गुन्हेगाराने मित्राचीच छातीत चाकू खुपसून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Gangappa Pujari

रामनाथ ढाकणे, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime: राज्यातील खुनांची मालिका काही थांबत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून हत्यांचे सत्र सुरु आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. बेधुंद नशेत असणाऱ्या मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना शहरातील विश्रांती नगर भागातील घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील विश्रांतीनगर भागात जुन्या वादातून बेधुंद नशेत असणाऱ्या गुन्हेगाराने मित्राचीच छातीत चाकू खुपसून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमोल उर्फ नंदू दाभाडे असं मृत तरुणाचं नाव आहे तर निलेश चव्हाण असं या मारेकर्‍याचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे हत्येआधी आरोपीने एकाच वेळी 8 नशेच्या गोळ्या आणि गांजा पिला, त्यानंतर एकाच घावात ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

या भयंकर घटनेने छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे. मागील आठवडाभरात हत्येची तिसरी घटना असून पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. या हत्येच्या घटनांमुळे शहरात भाईगिरी अधिकच वाढत चालल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिला नाही असाही सवाल उपस्थित होत आहे.

विवाहितेची आत्महत्या

वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आण असा तगादा लावून आणि शारीरिक,मानसिक छळाच्या त्रासाला कंटाळून बिडकीन येथील एका साडेचार महिन्याच्या 25 वर्षीय गर्भवती महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साधना किरण नरवडे असं या विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पतीसह 5 जणांवर बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीसह सासू आणि सासरा या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT