Crime News Saam Digital
क्राईम

Crime News: निर्दयीपणाचा कळस, पतीने स्टीलच्या झाऱ्याने केली मारहाण, पत्नीचा जागीच मृत्यू

Crime News: पतीने स्टीलच्या झाऱ्याने आणि लाथा बुक्क्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजीत ही घटना घडली आहे.

Sandeep Gawade

Crime News

पतीने स्टीलच्या झाऱ्याने आणि लाथा बुक्क्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजीत ही घटना घडली आहे. प्रियंका (वय 28) असं खून झालेल्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी पती संदीप विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी पतीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप आणि त्याची पत्नी प्रियंका यांच्यात काही कारणावरून वाद सुरू होता. यातून संतापलेल्या संदीपने प्रियंकाला स्टीलच्या झाऱ्याने मारहाण करायला सुरुवात केली. यात प्रियंका जखमी गंभीर जखमी झाली. मात्र आरोपीने तेवढ्यावरच न थांबता तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यातच प्रियंकाचा मृत्यू झाला. त्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपीला अटक केली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पत्नीची हत्या करून मृतदेह फेकला जंगलात, कल्याणमधील घटनेने खळबळ

रिक्षा घेण्यासाठी पत्नी माहेरून पैसे आणत नसल्याच्या कारणावरून पतीने फावड्याच्या दांड्याने मारहाण करत गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण, टिटवाळा परिसरात ही घटना घडली असून निर्दयीपणाचा कळस म्हणजे हत्येनंतर पत्नीचा मृतदेह एका ड्रममध्ये भरून ड्रम जंगलात फेकून दिला होता. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपी मैनुद्दीन अन्सारी याला बेड्या ठोकल्यात आहेत. अलीमुन अन्सारी असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT