Crime News Saam Tv
क्राईम

Buldhana Crime: धक्कादायक! व्यक्तीने रेल्वेखाली येऊन संपवलं जीवन; परिसरात हळहळ

Rohini Gudaghe

Buldhana News Person End Life Under Railway

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात नांदुरा तालुक्यातील दहिगाव येथील एका व्यक्तीने रेल्वे मालगाडीसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात रेल्वे स्टेशन नांदुरा खुमगावमध्ये (Nandura Khumgaon Railway Station) रेल्वे ट्रॅकवर एका व्यक्तीने रेल्वे मालगाडीसमोर येऊन आत्महत्या केली. आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.  (Latest Crime News)

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा वगैरे कार्यवाही केल्यावर मृतक इसम हा दहीगाव येथील आहे. त्याचं नाव कैलास ज्ञानदेव भोंडे (वय 38 वर्ष) असल्याचं निष्पन्न केलं आहे. मृतक व्यक्तीने मालगाडी समोर झोपून आत्महत्या केली, असं गाडीचे लोकोपायलट यांनी वाकीटाकीद्वारे नांदुरा रेल्वे स्टेशन मास्टरला कळवले (Buldhana Crime) होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मृतक व्यक्तीचा मृतदेह ओमसाई फाउंडेशन नांदुरा येथील ऍम्ब्युलन्सने शासकीय रुग्णालय नांदुरा येथे शवविच्छेदनासाठी नेले होते. याप्रकरणी पोलीस कार्यवाही झाल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल (Person End Life) केला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या व्यक्तीने आत्महत्या का केली, हे अजून स्पष्ट झालं नाही.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबात दु:खाचं वातावरण आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ते करत ( Ends Life Under Railway) आहे. या व्यक्तीने टोकाचा निर्णय का घेतला, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर काही वेळ गोंधळ निर्माण झाला (Buldhana News) होता.

बीड शहरातील घटना

बीड शहरातील सुभाष रोडवर नाली साफ करत असताना नालीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. बीड नगरपालिकेच्या (crime news) वतीने शहरामध्ये नाली साफसफाईचे काम करण्यात येत आहे. यावेळी सुभाष रोडवर नाली साफ करत असताना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नालीमध्ये आढळून आला.

त्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ शहर पोलिसांना याची माहिती दिली. यावेळी शहर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्यापही पटली नाही. दरम्यान हा घात आहे की अपघात आहे? याचा तपास आता बीड शहर पोलीस करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mpox test kit: झटपट आणि कमी खर्चिक! लवकरच बाजारात येणार भारतातील पहिलं Mpox रॅपिड टेस्ट किट

Maharashtra News Live Updates: विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, पिंपरी चिंचवडमधील घटना

Pune Porsche Case: आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला, बाल न्याय मंडळाचे २ अधिकारी बडतर्फ

Ratan Tata News: मैत्रीला सलाम! जिवलग दोस्त पुढे अन् रतन टाटांचे पार्थिव मागे; काळजाला भिडणारा VIDEO

Ratat Tata Passed Away : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वाहिली रतन टाटांना श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT