Buldhana Crime News:  Saamtv
क्राईम

Buldhana Crime: लग्नाच्या मिरवणुकीत तुफान राडा! दोन गटात दगडफेक; ३ जण जखमी

Buldhana Crime News: क्षुल्लक वादातून दोन गटात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. बुलढाण्यातील टूनकी गावात ही घटना घडली असून यावेळी झालेल्या दगडफेकीत ३ जण जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. २८ एप्रिल २०२४

बुलढाण्यामध्ये लग्नाच्या मिरवणुकीमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून दोन गटात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. बुलढाण्यातील टूनकी गावात ही घटना घडली असून यावेळी झालेल्या दगडफेकीत ३ जण जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी या गावात लग्नाच्या मिरवणुकीत तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. मिरवणुकीदरम्यान गाडीचा धक्का लागल्याने तसेच डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजवल्याने हा संपूर्ण वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी दोन गट आमने- सामने आले आणि मोठ्या प्रमाणात दगड, विटांचा मारा करण्यात आला. तसेच डीजेची गाडीही फोडण्यात आली.

या दगडफेकीत तीन जण जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळताच संग्रामपूर व सोनाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या टूणकी या गावात पोलीस बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

सातगाव भुसारी गावात राडा..

बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम सातगाव भुसारी येथे रात्रीच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात किरकोळ वादावरून हाणामारी झाली. यात 2 तरुण जखमी झाले आहेत्. रायपुर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बुलढाणा, चिखली आणि धाड येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री दोन्ही गटातील 18 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : वजन राहील कंट्रोलमध्ये अन् चेहराही करेल ग्लो, रोज नाश्त्यासोबत प्या 'ही' २ मिनिटांत बनणारी स्मूदी

Women Schemes In Maharashtra: महिलांसाठी आर्थिक वरदान ठरणार! 'या' ५ सरकारी योजना लाडकीला जबरदस्त लाभ मिळवून देणार, अर्ज कसा करायचा?

पुण्यात अनैतिक संबंधामुळे घडला रक्तरंजित थरार; मुलाने आईच्या बॉयफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं

Maharashtra News Live Update: नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून आणखी एकाला ताब्यात घेतलं

Navi Mumbai: नवी मुंबईत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT