Police investigation underway after a man allegedly killed his sister-in-law following a minor domestic dispute in Madhya Pradesh village. Saam Tv
क्राईम

'दादा मी वहिनीचा जीव घेतला...' भावाने सांगताच तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली; हत्येचे धक्कादायक कारण समोर

Brother Kills Sister In Law Over Tea Refusal In India: मध्यप्रदेशमध्ये एका किरकोळ वादातून दीराने स्वतःच्या वहिनीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चहा बनवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपीने दांड्याने मारहाण करून हत्या केली.

Omkar Sonawane

नातेसंबंधांची मर्यादा चिरडणारी एक धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मध्यप्रदेशमध्ये दीराने स्वतःच्या वहिनीची निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, खोहा येथील खेमचंद मालवीय सकाळी शेतात कामासाठी घराबाहेर गेले होते. घरात त्यांची पत्नी पूजा मालवीय (वय 32) ही आपल्या 8 वर्षांच्या मुलगा ऋतिकसोबत होती. सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास पूजा स्वयंपाकघरात जेवण बनवत असताना तिचा दीर रामू मालवीय (वय 27) तिथे आला आणि तिला चहा बनवण्यास सांगितले. मात्र, काही कारणास्तव पूजाने चहा बनवण्यास नकार दिला.

चहा बनवण्यास नकार दिल्याने रामूचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्याने जवळच असलेला दांडा उचलून पूजाच्या डोक्यावर घालत सलग वार केले. यामध्ये पूजा गंभीर जखमी झाली आणि खाली कोसळली. तिचा मृत्यू होईपर्यंत आरोपी तिचा नराधम दीर वार करत राहिला. घटनेनंतर दीर घराबाहेर आला. तेव्हा त्याचा मोठा भाऊ गणेशराम याने त्याला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहिले. विचारणा केल्यावर त्याने शांतपणे मी वहिनीला मारलं असे सांगितले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

काही तासांतच अटक

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश सिंह रघुवंशी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सांची येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी रामू मालवीय याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून काही तासांतच त्याला अटक केली. दरम्यान, या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

Accident News: बस आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक; भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू,२५ जखमी

SCROLL FOR NEXT