crime News Saam TV
क्राईम

Crime : घृणास्पद! महिलेचा खून करून मृतदेहावर बलात्कार, नागपुरात अमानवीय कृत्य

Nagpur Crime : मृतदेहासोबत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उपराजधानी नागपूरमध्ये घडली आहे. शरीरसंबंधास नकार दिला म्हणून महिलेचा खून केला, त्यानंतर बलात्कार करून पळ काढला.

Namdeo Kumbhar

Nagpur Crime News : उपराजधानी नागपूरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका विकृत तरूणाने विवाहित महिलेचा खून करून मृतदेहासोबत बलात्कार केल्याची संतापजनक घडली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक घटनेची माहिती मिळताच नागपूरकर संतापले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. शरीरसंबंधास नकार दिल्यामुळे रागाच्या भरात तरूणाने महिलाचा खून केला, त्यानंतर मृतदेहासोबत शरीरसंबंध ठेवल्याचं तपासात उघड झालेय.

नागपूरमधी हुडकेश्वरमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे समजतेय. पोलिसांनी आरोपी रोहितला बेड्या ठोकल्या असून चौकशी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रोहित आणि मृत महिला यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. महिलेने आरोपीला शरीरसंबंधास नकार दिला, त्यामुळे रागाच्या भरात त्याने आधी गळा दाबून महिलेचा खून केला. कपडे काढून मृतदेहावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेच्या अंगावर कपडे घालून आरोपी पसार झाला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले.हुडकेश्वर पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला ही मूळची मध्यप्रदेशची आहे. कामाच्या शोधात ६ वर्षांपूर्वी पतीसह नागपुरात आली होती. महिलेचा पती ढाब्यावर आचारी म्हणून काम करतो, तर मुलगी सातवीला आहे. आचारी पती सकाळी कामावर गेल्यानंतर मध्यरात्री एक वाजताच घरी येतो. मृत महिलेला दारूचे व्यसन होते, त्यामुळे येथील दोन-चार दारूड्या मुलासोबत तिची ओळख झाली होती. रोहित अन् मृत महिलेची ओळख झाली, त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले.

दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ते वारंवार भेटायचे. नवरा कामावर गेल्यानंतर आणि मुलगी शाळेत गेल्यावर रोहित मृत महिलेला तिच्या घरी भेटायचा. गुरूवारीही पती कामावर गेल्यानंतर महिलेने रोहितला फोन करून घरी दारू घेऊन बोलवले. दोघांनी दारु ढोसली आणि जेवण केले. नशेत असणाऱ्या रोहितने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. पण त्या महिलेने नकार दिला. संतापलेल्या रोहितने गळा दाबून तिचा खून केला. दारूच्या नशेत त्याने मृतदेहासोबत बलात्कार केला अन् पळ काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

गॅस सिलिंडरचा तुटवडा, हॉटेल व्यावसाय अडचणीत, अखेर घेतला मोठा निर्णय, वाचा नेमकं केलं काय?

Reliance 300 Billion Deal: मुकेश अंबांनींची अमेरिकेत ३०० अब्ज डॉलरची गुंतवणूक; सुरु करणार ऑइल रिफायनरी| VIDEO

LPG cylinder : कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरची नेमकी स्थिती काय? वाचा

Gudi Padwa 2026 Time: गुढीपाडवा किती तारखेला आहे? तारीख, मुहूर्त, तिथी आताच नोट करा

SCROLL FOR NEXT