Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: खोलीत बोलवून जबरदस्तीने किस, नंतर प्राइव्हेट पार्टला...; बॉक्सिंग कोचचं अल्पवयीन तरुणीसोबत विकृत कृत्य

Crime News: बॉक्सिंग क्लबच्या कोचविरोधात १७ वर्षीय खेळाडूच्या गैरवर्तनाची तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी POCSO कायद्यानुसार गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

Shruti Vilas Kadam

Crime News: बंगळुरू येथे एका बॉक्सिंग कोचविरोधात अल्पवयीन खेळाडूशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. कांतिरवा स्टेडियम परिसरातील 'लायन्स बॉक्सिंग क्लब'मध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. लैंगिक छळाबाबतची ही तक्रार पीडित मुलीच्या आईने दाखल केली आहे. १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीनंतर कोचविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

बॉक्सिंग कोचवर लैंगिक छळाचा आरोप

ही मुलगी गेल्या १० वर्षांपासून 'लायन्स बॉक्सिंग क्लब'मध्ये बॉक्सिंगचे ट्रेनिंग घेत आहे. तिच्या आईने २२ मे २०२६ रोजी कोचविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली. आरोपीचं नाव रामचंद्र असून तो ५० वर्षांचा, तोच या पीडित मुलीचा बॉक्सिंग कोच आहे. तक्रारदार महिलेने असा आरोप केला आहे की, हा च गेल्या चार वर्षांपासून तिच्या मुलीचा छळ करत होता. गेल्या पाच ते सहा महिन्यांत अशा घटनांचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये (FIR) नमूद केल्यानुसार, रामचंद्र याने कांतिरवा स्टेडियम परिसरात असताना अल्पवयीन मुलीशी अयोग्य शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि अनेकदा तिला अयोग्यरित्या स्पर्श केला.

ट्रेनिंगदरम्यान मुलीला अयोग्यरित्या स्पर्श

तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, १७ मे २०२६ रोजी चेन्नई येथे आयोजित एका बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान, कोचने अल्पवयीन मुलीला आपल्या खाजगी खोलीत बोलावले. तिथे त्याने तिच्याप्राइव्हेट पार्टला स्पर्श केला, तिचे बळजबरीने किस केलं आणि तिच्याशी अयोग्य वर्तन केले त्यानंतर, त्याने त्या मुलीला कोणाला काही सांगितले तर परिणाम गंभीर होतील अशी धमकी दिली. या घटनांची माहिती जर तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांना दिली, तर आपण तिला जीवे मारू, अशीही धमकी त्याने दिल्याचा आरोप आहे.

आरोपी बॉक्सिंग कोचविरुद्ध गुन्हा दाखल

एफआयआरमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, या छळाबाबतची तक्रार यापूर्वी एका समितीकडे दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आता 'लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा, २०१२' (POCSO Act) च्या कलम १२ आणि ८ अंतर्गत, तसेच 'भारतीय न्याय संहिता, २०२३' (BNS) च्या कलम ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT