bike thief arrested with 14 stolen two wheelers in manchar pune  Saam Digital
क्राईम

Pune Crime News : दुचाकी चोरीच्या टाेळीचा मंचर पाेलिसांकडून पर्दाफाश, युवकास अटक; 14 बाईक जप्त

bike thief arrested with 14 stolen two wheelers in manchar pune : यावेळी पाेलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला असता पाेलिसांनी त्यांना खाक्या दाखविताच संशयितांची भंबेरी उडाली.

रोहिदास गाडगे

मंचर, खेड, चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना मंचर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून एकूण 14 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील 9 दुचाकींच्या मालकांचा शोध लागला असून 5 मोटरसायकलच्या मालकांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पाेलिसांनी सुरज बिडकर आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

मंचर शहरात पाेलिस नाकाबंदी करत असताना त्यांना विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर तिघे जण दिसले. पाेलिसांनी वाहनाबाबत चैकशी केली असता त्यांचेकडे कोणतीही कागदपत्रे मिळुन आली नाहीत. यावेळी पाेलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला असता पाेलिसांनी त्यांना खाक्या दाखविताच संशयितांची भंबेरी उडाली.

दरम्यान पोलिसांनी वाहनाचे चासीस व इंजीन नंबर वरून वाहनाचा तपशिल घेतला असता संबंधित वाहन हे मंचर पोलिस ठाणे येथील चोरीचे गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले. पाेलिसांना तिघांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चाैकशी केली असता त्यांच्याकडून एकुण 14 गाड्या जप्त करण्यात आल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

SCROLL FOR NEXT